आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Successful Test Of Brahmos Air Launch Missile's Extended Range, Latest News And Update

दूरवरचे लक्ष्य भेदण्यात यश:ब्रह्मोस एअर लाँच क्षेपणास्त्राच्या एक्सटेंडेट रेंजची यशस्वी चाचणी, सुखोई विमानातून डागले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताने गुरुवारी सुखोई-30 एमकेआय (Su-30 MKI)लढाऊ विमानातून ब्रह्मोस एअर लाँच क्षेपणास्त्राच्या विस्तारित रेंज व्हर्जनची यशस्वी चाचणी घेतली. त्यात या क्षेपणास्त्राने बंगालच्या खाडीतील एका लक्ष्याचा अचूक वेध घेतला.

हवाई दलाने सांगितले की, Su-30 MKI विमानातून घेण्यात आलेली ब्रह्मोसच्या विस्तारित रेंज व्हर्जनची ही पहिलीच चाचणी होती. या चाचणीमुळे भारताने सुखोईच्या माध्यमातून जमीन व समुद्रातील प्रदिर्घ अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता प्राप्त केली आहे.

भारतीय हवाई दल, नौदल, डीआरडीओ, बीएपीएल व एचएएलच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताला ही संरक्षण सिद्धता प्राप्त झाली आहे. या चाचणीमुळे सुखोई विमानाची उच्च कामगिरी क्षमता व ब्रह्मोस क्षेपणास्त्राची अचूकता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या क्षेपणास्त्राचा पाक व चीन या भारताच्या दोन्ही शत्रू राष्ट्रांविरोधात चपखल वापर करता येईल.

बातम्या आणखी आहेत...