आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा धोका पुन्हा वाढला:24 तासांत 47 रुग्णांचा मृत्यू, 17,135 नवे रुग्ण; राजस्थानात सॅम्पलिंग वाढवण्याचे निर्देश

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मागील 24 तासांत 17, 135 नवे रुग्ण आढळले. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 7 रुग्णांचा बळी गेला. राज्यात 1932 नवे रुग्णही आढळलेत. यापूर्वी सोमवारी कोरोनाचे 16,492 नवे रुग्ण आढळले होते. तर 45 जणांचा बळी गेला होता.

दुसरीकडे, जगभरात मागील 24 तासांत 6 लाखांहून अधिक रुग्ण आढळले, तर 1128 जणांचा मृत्यूही झाला. सर्वाधिक 1 लाख 95 हजार रुग्ण जपानमध्ये आढळले.

राजस्थानात कोरोनाचे 343 नवे रुग्ण

राजस्थानात मागील 24 तासांत कोरोनाचे 343 नवे रुग्ण आढळले. पण एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जयपुरात सर्वाधिक 109 रुग्ण आढळले. यामुळ राज्यातील सक्रीय रुग्णांचा आकडा 2209 वर पोहोचला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आरोग्य मंत्री परसादी लाल मीणा यांनी राज्यातील सॅम्पलिंग वाढवण्याचे निर्देश दिलेत.

मध्य प्रदेशात कोरोनाचे 226 नवे रुग्ण

मध्य प्रदेशात मागील 24 तासांत कोरोनाचे 226 नवे रुग्ण आढळलेत. यामुळे राज्यातील सक्रीय रुग्णांचा आकडा 1480 वर पोहोचला आहे. राज्यातील इंदूर, भोपाळ व जबलपूर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहेत. येथील सक्रीय रुग्णसंख्या सर्वाधिक आहे.

दिल्लीत कोरोनाचे 5 बळी

दिल्लीतही मागील कोरोनाचे 2073 नवे रुग्ण आढळलेत, तर 5 जणांचा बळी गेला आहे. राजधानीतील संक्रमण दर 11.64% वर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनानुसार, राष्ट्रीय राजधानीतील संक्रमण दर सलग तिसऱ्या दिवशी 10 च्यावर राहिला आहे. यापूर्वी 24 जानेवारी रोजी दिल्लीचा संसर्ग दर 11.79 टक्के नोंदवण्यात आला होता.

महाराष्ट्रात 1,932 नवे रुग्ण, 7 मृत्यू

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे 1932 नवे रुग्ण आढळलेत. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील सक्रीय रुग्णांचा आकडा वाढून 80,52,103 वर पोहोचला असून, बळींचा आकडाही 1,48,117 वर पोहोचला आहे.

बातम्या आणखी आहेत...