आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Speech; Kolkata Film Festival |mamata Banerjee Bharat Ratna | Shah Rukh Khan

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलले बिग बी:काय बघायचं काय नाही हा प्रेक्षकांचा अधिकार! ममतांनी समर्थन करताच भाजपचा संताप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे सहसा वादग्रस्त विधाने करणे टाळतात. पण पहिल्यांदा त्यांनी नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली आहेत. मात्र आजही नागरिकांच्या स्वातंत्र्यावर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असे ते म्हणाले. अमिताभ बच्चन गेली अनेकवर्ष चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. आपल्या अभिनय कौशल्याने त्याने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकतेच त्यांनी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्नी जया बच्चन यांच्याबरोबर हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अर्जित सिंग, जया बच्चन, अमिताभ बच्चन आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती. या चित्रपट महोत्सवाची सांगता 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी अमिताभ यांच्या बोलण्याचे समर्थन केले. अमिताभ यांनी आज जे सांगितले. त्यासाठी हिंमत लागते, असे त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे अमिताभ यांच्या या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली आहे. अमिताभ यांनी अशा ठिकाणी स्वातंत्र्याबद्दल बोलले आहेत. जिथे निवडणुकीनंतर सर्वाधिक रक्तरंजित हिंसाचार झाला, असे भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटले.

अमिताभ बच्चन यांनी चित्रपट महोत्सवात भाषण स्वातंत्र्याबाबत बोलले. तेव्हा ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. यावेळी ममता म्हणाल्या की, माझ्या दृष्टीने अमिताभ बच्चन हे भारतरत्न आहेत. त्यांनाही भारतरत्न मिळावा, अशी आमची इच्छा आहे.
अमिताभ बच्चन यांनी चित्रपट महोत्सवात भाषण स्वातंत्र्याबाबत बोलले. तेव्हा ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. यावेळी ममता म्हणाल्या की, माझ्या दृष्टीने अमिताभ बच्चन हे भारतरत्न आहेत. त्यांनाही भारतरत्न मिळावा, अशी आमची इच्छा आहे.

प्रेक्षकांना हलक्यात घेऊ शकत नाही
अमिताभ म्हणाले की, आपण प्रेक्षकांना हलक्यात घेऊ शकत नाही. प्रेक्षकांकडे सर्व प्रकारचा आशय आहे. तो कुठे बघायचा ही त्यांची निवड आहे. शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत वाद सुरू असताना अमिताभ यांनी हे वक्तव्य केले आहे.

शाखरुख म्हणाला -नकारात्मक विचारांपासून दूर राहायचे

पठाण वादावर अभिनेता शाहरुख खानने मौन तोडले आहे. या चित्रपटाच्या वादात शाहरुखने पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. गुरुवारी कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातमध्ये शाहरुख म्हणाला की, जग काहीही करो. मी आणि तुम्ही जे सकारात्मक लोक आहेत... ते सर्व जिवंत आहोत! शाहरुखचा इशारा सोशल मीडियावर चित्रपटाला ट्रोल करणाऱ्यांकडे होता.

शाहरुख इथेच थांबला नाही. सोशल मीडियावर निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या लोकांवरही त्याने भाष्य केले. आधुनिक काळ आणि सोशल मीडियाबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला की, आजच्या काळात सोशल मीडियाद्वारे सामूहिक कथन केले जाते.

मी कुठेतरी वाचले होते, निगेटिव्हिटी सोशल मीडियाच्या युजला वाढवते. याशिवाय त्याचे व्यावसायिक मूल्यही वाढते. अशा कथा आपली दिशाभूल आणि फूट पाडण्याचे काम करतात. पुढे तो म्हणाला की, काहीही झाले तरी आपल्याला सकारात्मक राहावे लागेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहायचे आहे. शाहरुख एवढे बोलताच नेताजी इनडोअर स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटात झाला.

शाहरुख आणि राणीने अमिताभ-जया बच्चन यांना नमस्कार केला

तत्पूर्वी कार्यक्रमात पोहोचलेल्या शाहरुख खानने आपल्या स्टाईलने करोडो लोकांची मने जिंकली. मोठ्या व्यक्तींच्या उपस्थितीत त्याने अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या चरणांना स्पर्श केला. राणी मुखर्जीही अमिताभ आणि जया बच्चन यांच्या पायाला स्पर्श करताना दिसली.

ममता म्हणाल्या- अमिताभ यांना भारतरत्न द्यायला हवा
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 28 व्या आवृत्तीच्या उद्घाटनाला सर्व चित्रपट कलाकारांसह हजेरी लावली होती. महोत्सवात पोहोचलेल्या सीएम ममता यांनी अमिताभ बच्चन यांना भारतरत्न देण्याची मागणी केली.

ममता म्हणाल्या की, अमिताभ यांना भारतीय चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ योगदान दिल्याबद्दल भारतरत्न देण्याची मागणी बंगाल करणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाषणातून भाजपवर निशाणा साधला. ममता म्हणाल्या की, बंगाल मानवता, एकता, विविधता आणि एकात्मतेसाठी लढतो. बंगाल ना डोकं झुकवतो ना भीक मागतो. मानवतेसाठी, विविधतेतील एकतेसाठी बंगालने नेहमीच धैर्याने लढा दिला आहे. यापुढेही हा लढा सुरूच राहणार आहे. बंगाल कधीही झुकत नाही, कधीही भीक मागत नाही, नेहमीच आपले डोके उंच ठेवतो.

महेश भट्ट म्हणाले - पाश्चिमात्य विचार नाकारू शकत नाही
महेश भट्ट यांचेही कार्यक्रमात भाषण झाले. ते म्हणाले- आजच्या राजकीय वातावरणात भारतातील मुले पाश्चिमात्य विचार नाकारण्याचा प्रयत्न करतात. हे आमचे ध्येय नाही. टागोरांचे हे शब्द सर्व भारतीयांच्या हृदयात गुंजले पाहिजेत की भारत हा सर्व जातींना एकत्र आणण्यासाठी आहे.

भट्ट पुढे म्हणाले की, कोणतीही जात, कोणतीही संस्कृती नाकारणे हा भारताचा आत्मा नाही. सहानुभूती आणि प्रेमाने सर्व गोष्टी समजून घेणे हे आपले सर्वोच्च ध्येय असले पाहिजे. हा भारताचा आत्मा आहे.

चित्रपट महोत्सव 22 डिसेंबरपर्यंत
28व्या कोलकाता फिल्म फेस्टिव्हलच्या सुरुवातीचा चित्रपट हृषिकेश मुखर्जीचा अभिमान आहे. यादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि क्रिकेटपटू सौरव गांगुलीही दिसले. हा चित्रपट महोत्सव 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. महोत्सवासाठी 42 देशातील 183 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

57 देशांतील एकूण 1078 चित्रपटांनी महोत्सवासाठी अर्ज केले होते. या कालावधीत कोलकातामधील 10 ठिकाणी सुमारे 215 शो दाखवले जातील. महोत्सवादरम्यान सत्यजित रे यांच्यावरील प्रदर्शन, टॉक शो आणि चित्रपटांवरील चर्चा आणि कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत.

'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाल्यास थिएटर जाळा

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' या चित्रपटाला अयोध्येतील संत समाजाकडून विरोध होत आहे. ज्या चित्रपटगृहांमध्ये 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित होईल, ते जाळून टाका, असे वादग्रस्त विधान हनुमानगढीचे महंत राजुदास यांनी केले आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग...' या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. गाण्यात शाहरुख आणि दीपिकाचे बोल्ड सीन्सदेखील आहेत. भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने वादंग उठले आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शाहरुख खानने 'पठाण'साठी घेतली तगडी रक्कम

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण' हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. दरम्यान या चित्रपटासाठी तिन्ही लीड स्टार्सनी तगडी रक्कम घेतल्याचे बोलले जात आहे. दीपिकाने 'पठाण'साठी 15 कोटी तर जॉनने 20 कोटी रुपये घेतले आहेत. इतकेच नाही तर शाहरुखने 'पठाण'साठी तब्बल 100 कोटी रुपये फी आकारल्याचेही वृत्त आहे. ही रक्कम दोन्ही अभिनेत्यांनी घेतलेल्या मानधनापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

'पठाण'च्या यशासाठी साकडे घालायला शाहरुख वैष्णोदेवीला पोहोचला होता

शाहरुख खानने रविवारी (11 डिसेंबर) माँ वैष्णो देवीचे दर्शन घेतले. तो त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येथे पोहोचला होता. दरम्यान त्याने वैष्णोदेवी मंदिरात जाऊन चित्रपटाच्या यशासाठी देवीकडे साकडे घातले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शाहरुख काही दिवसांपूर्वी मक्का येथे पोहोचला होता

शाहरुख खान काही दिवसांपूर्वी 'डंकी' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून मक्का येथे पोहोचला होता. शाहरुखने इस्लामिक तीर्थक्षेत्र असलेल्या मक्का येथे उमराह (प्रार्थना) केला होता. हा फोटो शेअर करत सौदी अरेबियातील एका पत्रकाराने शाहरुखने मक्का गाठल्यानंतर उमराह केल्याची पुष्टी केली होती. यावेळी तो पांढऱ्या कपड्यात दिसला होता. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...