आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Modi Government's Decision In The Meeting Of The Group Of Ministers, The Price Of Sugarcane For The Next Season Is Rs 3050

उसाच्या FRP मध्ये प्रतिटन 150 रुपयांची वाढ:अर्थविषयक बैठकीत केंद्राचा निर्णय, आगामी हंगामात उसाला 3050 रुपयांचा भाव

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्राकडून ऊसदराच्या एफआरपीत वाढ, टनाला 3050 रूपये दर देण्याचा निर्णय

उसाच्या एफआरपीत प्रतिटन 150 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. ही वाढ करताना शासनाने 'रिकव्हरी बेस' मध्येही वाढ केली आहे. त्यामुळे आता 10.25 टक्के 'रिकव्हरी बेस'नुसार शेतकऱ्यांना वाढीव एफआरपीमध्ये आता 75 रुपयांचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. प्रत्येक 1 टक्क्या साखर उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना 297 रुपये मिळणार आहेत. 2022-23 या आगामी हंगामापासून शेतकऱ्यांना वाढीव एफआरपीत देणे साखर कारखान्यांसाठी बंधनकारक असणार आहे.

सरकारने आगामी ऊस हंगामासाठीचा एफआरपी दर जाहीर केला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत केंद्राने टनापाठीमागे 75 रुपये वाढ करत 3050 रुपये दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळ रिकव्हरीचा दर गृहीत धरून म्हणजे 10.25 टक्के रिकव्हरीला 3050 रुपये टनापाठीमागे दर वाढणार आहे. दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत हा दर वाढला असला तरी डिझेल आणि रासायनिक खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना हा दर परवडेल का याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे.

एफआरपीत 34 टक्क्यांपेक्षा वाढ

केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षातील सुमारे 34 टक्क्यांपेक्षा जास्त एफआरपीत वाढ केली आहे. त्यानुसार आता आगामी गाळप हंगामापासून एफआरपीत 150 रुपयांची वाढ होणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. साखर उद्योगाचे अर्थकारण 80 टक्के साखरेपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असतो, तर 20 टक्के उत्पन्न हे अन्य पदार्थापासून मिळते. सध्या 10 टक्के इथेनॉल निर्मिती केली जात आहे.

या हंगामापासून मिळणार

ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या ऊस- साखर हंगामासाठी हा एफआरपी दर दिला जाईल. गेल्या आठ वर्षात एफआरपी दरात 34 टक्क्यांनी वाढ करण्यात आली असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. एफआरपी दरात यंदा क्विंटलमागे 15 रुपयांची वाढ झालेली आहे. मूळ रिकव्हरी दर 10.25 टक्के गृहीत धरून क्विंटलमागे 305 रुपये इतका एफआरपी दर दिला जाणार असून प्रत्येक वाढीव 0.1 टक्के रिकव्हरीमागे 3.05 रुपये इतका प्रीमियम अर्थात दरवाढ दिली जाईल. हेच सूत्र मूळ रिकव्हरी दरापेक्षा कमी रिकव्हरी भरणाऱ्या उसासाठी वापरले जाईल.

रिकव्हरी नाही एफआरपी नाही

साडेनऊ पेक्षा कमी रिकव्हरी भरणाऱ्या उसासाठी हे सूत्र लागू असणार नाही. याठिकाणी शेतकऱ्यांना क्विंटलमागे 282.12 रुपये या दराने एफआरपी दिला जाईल. चालू साखर वर्षात हा दर 275.50 रुपये इतका आहे. पुढील साखर वर्षासाठी ऊस उत्पादनाचा क्विंटलमागचा खर्च 162 रुपये इतका गृहीत धरण्यात आला आहे. दरम्यान 10 लाख टन साखर निर्यातीसाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असून याबाबतची अधिसूचना लवकरच काढली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...