आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:भादंवि कक्षेतील गुन्हे जीएसटीबाहेर होणार

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायदा करदात्यांसाठी आणखी सुलभ करण्यासाठी सरकार भारतीय दंड संहितेच्या कक्षेत आधीपासून असलेल्या दंडात्मक गुन्ह्यांना हटवण्याबाबत विचार करत आहे. सूत्रांनी सांगितले की, यासाठी विधी समितीने जीएसटी कायद्याच्या कलम १३२ मधील दुरुस्तीला अंतिम रूप दिले आहे. हा प्रस्ताव जीएसटी कायद्याच्या कक्षेतून काही गुन्ह्यांना बाहेर करण्याच्या प्रयत्नांतर्गत आणला आहे. जीएसटी परिषदेच्या पुढील बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे. प्रस्तावास जीएसटी परिषदेची मंजुरी मिळाल्यास वित्त मंत्रालय यानंतर जीएसटी कायद्यात दुरुस्तीचा प्रस्ताव देण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...