आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयआयटी प्लेसमेंट:3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 काेटींहून जास्तची ऑफर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयआयटीच्या गुरुवारी सुरू झालेल्या प्लेसमेंट हंगामात पहिल्या दिवशी दिल्ली, कानपूर व मुंबईच्या ३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ काेटी रुपयांहून जास्तचे वार्षिक पॅकेज मिळाले. आयआयटी मद्रासच्या २५ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक काेटी रुपयांहून जास्तीचे पॅकेज मिळाले. आयआयटीनुसार वेतनाचे हे पॅकेज प्री प्लेसमेंट आॅफर (पीपीआे) अंतर्गत आहे. ४ काेटींवर पॅकेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना ट्रेडिंग फर्म जेन स्ट्रीटने हा प्रस्ताव दिला. गेल्या वर्षी उबेरने सर्वाधिक २.१६ काेटींचे पॅकेज आॅफर केले हाेते. आयआयटी मद्रासमध्ये १५ विद्यार्थ्यांना रुब्रिक, काेहेसिटी, आॅप्टिवरसारख्या कंपन्यांकडून आॅफर आहेत. आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक १.०६ काेटींसह सहा आॅफर मिळाल्या आहेत. आयआयटी गुवाहाटीला १३० आॅफर मिळाल्या आहेत. त्यात सर्वाधिक २.४ काेटी रुपयांची आंतरराष्ट्रीय आॅफर हाेती.

आयआयटी बॉम्बेमध्ये पहिल्याच दिवशी दिल्या १७५ जाॅब ऑफर्स आयआयटी बॉम्बेमध्ये प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी ४६ कंपन्यांनी मुलाखती घेऊन १७५ नोकऱ्यांच्या ऑफर्स दिल्या आहेत. प्लेसमेंटचा हा पहिला सीझन १५ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी नोकरीच्या ऑफर स्वीकारणाऱ्यांना कितीचे पॅकेज मिळाले, त्याचा अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. पहिल्या सीझनमध्ये ३०० कंपन्या सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...