आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लाँड्रिंग प्रकरण:यंग इंडियनचे कार्यालय ईडीकडून तात्पुरते सील

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी नॅशनल हेराॅल्ड मुख्यालयातील यंग इंडियन लिमिटेडचे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात सील केले. ईडीने नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मंगळवारी येथे छापे टाकले होते. तेव्हा अधिकृत प्रतिनिधी हजर नसल्याने पुरावे गोळा करता आले नव्हते. ते सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले तत्पूर्वी,काँग्रेस मुख्यालय, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या घराबाहेर प्रचंड पोलिस दल तैनात करण्यात आले.

सुप्रीम कोर्टाने आदेशावर फेरविचार करावा : विरोधक
तृणमूल काँग्रेस आणि आपसहित १७ विरोधी पक्षांनी पीएमएलएमधील दुरुस्त्या कायम राखण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षांनी न्यायालयाला या आदेशावर फेरविचार करण्याची विनंती केली.

बातम्या आणखी आहेत...