आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Officials Will Ask Kashmiri Pandits Where They Want Postings, The Administration Will Transfer Them In The Valley

प्रयत्न:काश्मिरी पंडितांना अधिकारी विचारणार, कुठे हवीय पोस्टिंग, खोऱ्यामध्येच बदली करणार प्रशासन

जम्मू-काश्मीर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याच्या मागणीवरून काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान रोजगार पॅकेजअंतर्गत काम करणाऱ्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांकडे जाऊन त्यांच्याकडून सुरक्षित ठिकाणी पोस्टिंगची माहिती घेण्याचे निर्देश केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. काश्मीरचे विभागीय आयुक्त पांडुरंग पोळ म्हणाले, बदल्या फक्त काश्मीर विभागांतर्गतच केल्या जातील. नव्या पोस्टिंगचे स्थळ नगरपालिका हद्दीत किंवा नगरपालिका शहरांच्या ३ किमी आत असेल. खोऱ्यात सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याचा सरकारचा निर्णय पंडितांनी रद्द केल्यानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. पीएम पॅकेज आणि जम्मूआधारित कर्मचाऱ्यांना नगरपालिका हद्दीच्या ३ किमी आत समायोजित करणे शक्य आहे का, असा सवाल कर्मचारी रंजन यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, आम्ही फिरतीवर असतो. कार्यालयात बसून आपल्या कामाला न्याय देता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...