आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये देशभरात लग्न समारंभ झाले नाहीत. अशातच पंजाबातील जालंधरच्या डीएव्ही काॅलेजचे प्राध्यापक डाॅ. एस.के. तुली यांच्या एकुलत्या एक मुलाने मुंबईत लग्न केले. हे आगळेवेगळे लग्न ठरले, कारण यात वधू-वराशिवाय फक्त लग्न लावणारे गुरुजीच उपस्थित होते. कन्यादानाचा विधी मंदिरात राहणाऱ्या महिलेने पार पाडला. या लग्नाला २०० हून अधिक लोकांनी वेबिनारच्या माध्यमातून ऑनलाइन हजेरी लावून शुभेच्छा व आशीर्वाद दिले. प्रा. डॉ. एस.के. तुली आणि प्रा. रिचा तुली यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा गौरव आणि वधू महक मैनी मुंबईत नोकरी करतात. गत महिन्यात त्यांचे लग्न होणार होते, लाॅकडाऊन सुरू झाला. दोघेही एकमेकांचे शाळेपासूनचे मित्र आहेत. या परिस्थितीत त्यांनी वधूचे आई-वडील विवेक आणि पूनम यांच्याशी चर्चा करून तिथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी या लग्नात ऑनलाइन सहभागी होऊन दोघांना आशीर्वाद दिले.
आणि प्रा. रिचा तुली यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा गौरव आणि वधू महक मैनी मुंबईत नोकरी करतात. गत महिन्यात त्यांचे लग्न होणार होते, लाॅकडाऊन सुरू झाला. दोघेही एकमेकांचे शाळेपासूनचे मित्र आहेत. या परिस्थितीत त्यांनी वधूचे आई-वडील विवेक आणि पूनम यांच्याशी चर्चा करून तिथेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही कुटुंबांनी या लग्नात ऑनलाइन सहभागी होऊन दोघांना आशीर्वाद दिले.
२०० नातेवाइकांची ऑनलाइन हजेरी, मंदिरात राहणाऱ्या महिलेने केले कन्यादान गौरव आणि महक या वर-वधूने दै. दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, कोरोनामुळे मानसिक तणावात होतो. त्यामुळे एकमेकांच्या नैतिक, मानसिक आधाराची गरज होती. आम्ही आईवडिलांशी याविषयी चर्चा केली आणि त्यांनी या लग्नाला होकार दिला. महकने सांगितले की, कन्यादान मंदिरात राहणाऱ्या एका महिलेने केले.
मुलाची आई प्रा. रचना तुली म्हणाल्या की, आमच्यासाठी मुलांचे सुख जास्त महत्त्वाचे आहे. सेलिब्रेशन नंतरही करता येईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.