आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातुमचा आनंद वयावर अवलंबून नाही. वृद्धापकाळात आजार, एकटेपणा व असहायता काय असते हे अमेरिकेत राहणाऱ्या सर्व भारतीय वृद्धांना माहीतच नाही. कारण उतारवयात ते लाचार म्हणून वृद्धाश्रमात जात नाहीत, तर ते ओल्ड एज क्लबचा भाग होऊन अत्यंत आनंदाने राहतात. ५८ वर्षांच्या सुलताना पहिल्यांदा मुलीसह कोलकाताहून अमेरिकेला आल्या तेव्हा परक्या देशात परक्या लोकांमध्ये कशी राहणार, मला तर इंग्रजीदेखील येत नाही, असे त्यांना वाटत होते. या भीतीने अनेक महिने त्या घरातून बाहेरही निघाल्या नाहीत. मग त्यांनी पतीसोबत ‘देशी सीनियर सेंटर’मध्ये जायला सुरुवात केली. येथे त्यांना त्यांच्यासारखेच अनेक वृद्ध भेटले. त्यांच्या जीवनशैलीने त्यांचे आयुष्यच बदलले.
या गेटेड कम्युनिटीत दररोज वृद्धांचे ध्यानधारणा न योगासनांचे वर्ग होतात. दुपारच्या व रात्रीच्या जेवणात शाकाहारी भारतीय अन्न मिळते. वेगवेगळ्या धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळी प्रार्थनास्थळे आहेत. येथे रोज भजने होतात. करमणुकीसाठी २० भारतीय चॅनल व हाय स्पीड इंटरनेट आहे. बॉलीवूड चित्रपट दाखवले जातात. वृद्धांना अनेक प्रकारचे गेम्स खेळवले जातात. एकमेकांचे वाढदिवस मिळून साजरे करतात. यांची मैत्री इतकी घट्ट आहे की, गोष्टी आणि हास्याच्या फवाऱ्यांमध्ये वेळ कधी निघून जातो कळतच नाही. होळी, दिवाळी आदी सण जल्लोषात साजरे केले जातात. प्रत्येक प्रकारच्या इमर्जन्सी सेवा उपलब्ध आहेत. येथे वृद्धांना भाषांसह अनेक आधुनिक गॅजेट्सही शिकवले जातात.
हे दृश्य अमेरिकेतील देशी रिटायरमेंट होमचे आहे. गेल्या काही वर्षांत अमेरिकेमध्ये अशा होम्सची संख्या वेगाने वाढत आहे. याचे मोठे कारण म्हणजे अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत भारतीयांचा वाटा १.३% पर्यंत पोहोचला आहे. तसेच वृद्धांची संख्याही वाढली आहे. जिथे सॉफ्टवेअर कंपन्यांची मुख्यालये आहेत व भारतीय व्यावसायिक मोठ्या संख्येने राहतात अशा अशा ठिकाणी सर्वाधिक सीनियर होम्स उघडले आहेत. तथापि, येथे फक्त भारतीयच राहतात असेही नाही. नुकत्याच उघडलेल्या एका नव्या सेंटरमध्ये १५० पेक्षा जास्त बांगलादेशी वृद्ध राहत आहेत. पैकी अनेक कमी उत्पन्न गटातील आहेत.
२००८ मध्ये भारतीय-अमेरिकी डॉक्टरांनी आपल्या वृद्ध माता-पित्याच्या देखभालीसाठी न्यूयॉर्कमध्ये पहिले देशी सीनियर सेंटर उघडले. आता त्यांची संख्या १०० पेक्षा जास्त झाली आहे. त्यात अनेक देशांचे सुमारे २० हजार वृद्ध राहतात. त्यांच्याकडून कोणतेच शुल्क घेतले जात नाही. म्हणजेच सर्व सुविधा मोफत. या सेंटरच्या पायाभूत सुविधांसाठी न्यूयॉर्क सिटी काैन्सिलने एक लाख डॉलर (सुमारे ८० लाख रु.) दिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.