आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन देशांत नातेवाईक मात्र, नागरिकत्व मिळेना:मुंबई हायकोर्टात घेतली धाव; युगांडा, ब्रिटननेही दिला नकार, 67 वर्षीय महिला 'स्टेटलेस'

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुप्रसिद्ध बंगाली लेखिका तस्लिमा नसरीन यांची एक कादंबरी आहे 'औरत का कोई देश नहीं' या कादंबरीत तस्लिमा यांनी स्त्रियांच्या व्यथा मांडल्या आहेत. बांगलादेशातून हद्दपार झाल्यानंतर तस्लिमा नसरीन यांना अनेक देशांमध्ये नागरिकत्वासाठी भटकंती करावी लागली. भारतातही त्यांना नागरिकत्व देण्यात आले नाही. अशीच कथा आहे इला पोपट यांची

इला पोपट यांना स्वतःचा देश नाही. 57 वर्षांपासून भारतात राहणाऱ्या इला यांचा नागरिकत्वाचा अर्ज तीन वेळा फेटाळण्यात आला आहे. भारताशिवाय ब्रिटन आणि युगांडानेही त्यांना नागरिकत्व देण्यास नकार दिला.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 67 वर्षीय इला पोपट सध्या स्टेटलेस आहे. आपणास नागरिकत्व मिळावे म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. जेणेकरून त्यांचाही एक देश असेल. ज्याला ते स्वतःचे म्हणू शकतील असे त्यांना वाटते.

इला यांनी नागरिकत्व मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
इला यांनी नागरिकत्व मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

आई-वडील गुजरातमधून युगांडात स्थलांतरित
वास्तविक, इला यांचे आई-वडील मूळ गुजरातमधील पोरबंदरचे रहिवासी होते. कालातंराने ते युगांडा या आफ्रिकन देशात स्थायिक झाले. युगांडाच्या तत्कालीन ब्रिटिश वसाहतीत मोठ्या संख्येने भारतीय व्यापारी राहत होते. तिथली त्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती बऱ्यापैकी होती. त्यांना तिथे लोकल भाषेत ब्राऊन साहेब म्हटले जायचे. पण युगांडात स्थायिक झालेल्या ब्राऊन साहेबांनी स्थानिकांना चांगली वागणूक दिली नाही. त्यामुळेच इंग्रंजाची कमकुवत स्थिती असताना तेथे राहणाऱ्या भारतीयांविरुद्ध द्वेष वाढू लागला. त्यानंतर मोठ्या संख्येने भारतीय वंशाच्या व्यापाऱ्यांनी युगांडा सोडले. ब्रिटन किंवा भारताचे नागरिकत्व घेतले. इला यांचे पालकही ब्रिटीश पासपोर्टवर भारतात स्थायिक झाले. त्यावेळी इला फक्त 10 वर्षांच्या होत्या.

पती, मुलं, नातवंडे भारतीय, आजीला मात्र देशच नाही
तरुण वयात भारतात आल्यानंतर इला पूर्णपणे इथल्याच झाल्या. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य आधीच गुजरातमध्ये राहत होते. अशा स्थितीत त्याला इथे जुळवून घ्यायला काहीच हरकत नव्हती. इला यांचे लग्नही इथेच झाले, त्यांना मुले, नातवंडे देखील आहेत. सर्व भारतीय नागरिक आहेत. तर ईला पोपट यांना मतदान करता येते. त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स देखील आहे. मात्र, त्यांना भारतीय पासपोर्ट देण्यात आलेला नाही.

युगांडा आणि ब्रिटननेही अर्ज फेटाळला
भारताचे नागरिकत्व न मिळाल्याने इलाने युगांडाच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला. भारतातील युगांडा दूतावासाने कबूल केले की इला यांचा जन्म युगांडात झाला होता. परंतु त्यांनी इला यांचा अर्ज नाकारला होता. कारण इला यापुर्वी देखील युगांडाची नागरिक नव्हत्या. आई-वडिलांच्या ब्रिटिश नागरिकत्वाच्या आधारे इलाने ब्रिटिश नागरिकत्वासाठीही प्रयत्न केले. मात्र येथेही त्या अपयशी ठरल्या.

नातेवाइकांच्या लग्नाला उपस्थित राहता येईना
इला यांच्या कुटुंबातालील बहुतांश सदस्य ब्रिटनमध्ये राहतात. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा कुटुंबात लग्नकार्य असते तेव्हा त्यांना इच्छा असूनही उपस्थित राहता येत नाही. इला यांनी ब्रिटन देशात देखील अपील केले होते. त्यांना काही काळ तरी नागरिकत्वा शिवाय देशात येण्याची परवानगी द्यावी, जेणेकरून त्या त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना भेटू शकेल. पण इलाकडे कोणत्याही देशाचा पासपोर्ट नसल्याने त्यांना परवानगी देण्यात आली नाही.

बातम्या आणखी आहेत...