आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Old Man Climbed The Bridge To Commit Suicide With A Bundle Of Money, Tossed A Note And Said It's All In Vain

गुजरात:पैशांचे गाठोडे घेऊन आत्महत्येसाठी पुलावर चढला वयोवृद्ध, नोट उडवत म्हणाला- हे सर्व व्यर्थ आहे

अंकलेश्वर (गुजरात)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृद्धाने सुमारे 10 हजार रुपयांच्या नोटा हवेत उडवल्या

राष्ट्रीय महामार्गावर वालिया चौकातील पुलावर एक विक्षिप्त वयोवृद्ध नागरिक चढला आणि हवेत पैसे उडवत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, लोकांनी त्याला वाहतूक पोलिस वाचवण्यासाठी येत नाहीत तोपर्यंत बोलण्यात गुंतवून ठेवले. तो कौटुंबिक समस्या व कोरोनामुळे चिंतित होता. अर्धा तास चाललेल्या या नाट्यानंतर वयोवृद्धाला समजावून खाली उतरवण्यात आले.

वयोवृद्ध नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा तालुक्यातील झांख गावातील विजयभाई वसावा असल्याचे नंतर स्पष्ट झाले. वसावा सतत सांगत होते की, सध्याच्या स्थितीत पैसा काहीच कामाचा नाही. कोरोना काळात सर्व त्रस्त आहेत. पैसे खर्च केल्यानंतरही आपल्या लोकांचे प्राण वाचत नाहीत, म्हणून पैसे आता काही कामाचे नाहीत. असे म्हणत त्याने सुमारे १० हजार रुपयांच्या नोटा हवेत उडवल्या. खाली उभ्या असलेल्या अनेक लोकांनी नोटा उचलल्या आणि निघून गेले.

बातम्या आणखी आहेत...