आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Olympian Wrestler Sushil Kumar Arrested By Delhi Police In Sagar Rana Murder Case | Chhatrasal Stadium

कुस्तीत प्रतिष्ठा कमावली, कुस्तीदिनीच गमावली:कुस्तीतील विश्वजेता सुशीलकुमार अटकेत; 6 दिवस पोलिस कोठडी

नवी दिल्ली/सोनिपत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका ज्युनियर पहिलवानाच्या हत्या प्रकरणात अटक करून घेऊन जाताना पोलिस. - Divya Marathi
एका ज्युनियर पहिलवानाच्या हत्या प्रकरणात अटक करून घेऊन जाताना पोलिस.
  • ...आता तोंड लपवावे लागले कुस्ती सोडून गुन्हेगारीचे डावपेच, हत्येच्या प्रकरणात झाला जेरबंद
  • ...तेव्हा असा तिरंगा फडकावला ऑलिम्पिकची सलग दाेन पदके जिंकणारा सुशील पहिला भारतीय

कुस्तीतील एकमेव भारतीय विश्वजेता, दोन ऑलिम्पिक पदके, ३ कॉमनवेल्थ सुवर्णपदके जिंकणाऱ्या सुशीलकुमारला रविवारी जागतिक कुस्तीदिनी अटक झाली. १९ वर्षीय पहिलवान सागर धनखडच्या हत्याप्रकरणी सुशील (३८) व त्याचा मित्र अजयला पोलिसांनी अटक केली. कोर्टाने त्यांना ६ दिवसांची कोठडी सुनावली. ४ मे रोजी रात्री सुशीलने सागरसह तिघांना मारहाण केली होती. सागरचा दुऱ्या दिवशी मृत्यू झाला. तेव्हापासून सुशील फरार होता.

पद्मश्री ते राजीव गांधी खेलरत्न
सुशील दिल्लीजवळ बपरोला गावात वाढला. १४व्या वर्षी आखाड्यात उतरला. जवळपास २० वर्षे डावपेचांनी साथ दिली. पद्मश्री, अर्जुन पुरस्कारासह राजीव गांधी खेलरत्नही मिळाला.

गँगस्टरशी जवळीक
आरोप आहे की, सुशील वादग्रस्त इस्टेट खरेदी करत असे. छत्रसाल स्टेडियममध्ये त्याची दादागिरीच होती. दिल्लीत बहुतांश टोलनाक्यांवर सुशीलचे लागेबांधे होते. याच्या वसुलीची जबाबदारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडे आहे. या काळात तो अनेक गँगस्टर्सच्या संपर्कात होता.दिव्य मराठी इनसाइड... स्वत:च्याच व्हिडिओत अडकला
सुशीलविरुद्ध सर्वात मोठा पुरावा म्हणजे एक व्हिडिओ आहे. यात तो सागरला बेदम मारहाण करताना दिसतो. सागर सीनियर नॅशनल कॅम्पमध्ये होता. तो ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तो सुशीलच्या पत्नीच्या नावे आहे. सागरने फ्लॅट सोडला, पण दोन महिन्यांचे भाडे येणे बाकी होते. सुशीलने साथीदार प्रिन्समार्फत सागरला मारतानाचा व्हिडिओ काढला होता. पहिलवानांत दरारा निर्माण व्हावा हा त्यामागे उद्देश होता. भविष्यात कुणीही वाटे जाऊ नये म्हणून सुशीलने हा कारनामा केला, पण प्रिन्स पोलिसांच्या हाती लागला अन् सुशीलच्या सहभागाचा आयता पुरावा सापडला.

काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी सांगितल्यानुसार, ५ मे रोजी छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यात गोळीबारदेखील करण्यात आला होता. या हाणामारीत सागर (२३), सोनू (३७), अमित कुमार (२७) आणि इतर 2 पैलवान जखमी झाले होते.

सागरचा उपचारादरम्यान मृत्यू

या हाणामारीत जखमी झालेल्या सागरचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो दिल्ली पोलिसांतील हेड कॉन्स्टेबलचा मुलगा होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही हाणामारी संपत्तीच्या वादातून झाली होती. सागर आणि त्याचे मित्र ज्या घरात राहत होते, ते घर रिकामे करण्यासाठी सुशील कुमार दबाव टाकत होता.

घटनास्थळावरुन डबल बॅरल गन आणि काडतूस मिळाले

पोलिसांना घटनास्थळावरुन ५ गाड्यांसह एक लोडेड डबल बॅरल गन आणि ३ जिवंत काडतूस सापडले. दरम्यान, या प्रकरणात प्रसिद्ध पैलवान सुशील कुमारवर गंभीर आरोप असल्यामुळे दिल्ली पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

सुशीलने आरोपांचे खंडन केले
घटनेच्या एका दिवसानंतर सुशील कुमारने आपली बाजू मांडली होती. त्याने म्हटले होते की, हाणामारी झालेल्या पैलवानांची टोळी आमच्या ओळखीची नव्हती. त्यांची हाणामारी सुरू होती, तेव्हा आम्हीच पोलिसांना सूचना दिली होती.

बातम्या आणखी आहेत...