आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात 24 तासात 1 लाख 93 हजार नवीन कोरोना संक्रमित आढळले आहेत. 60,182 लोक बरे झाले आणि 442 लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 लाख 33 हजार 318 ची वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या 9.48 लाख कोरोना संक्रमितांवर उपचार सुरु आहेत.
देशात अॅक्टिव्ह केसमध्येही 1.32 लाखांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत अॅक्टिव्ह केस पहिल्यांदा 9 लाखांच्या पार गेल्या आहेत. तर नवीन संक्रमितांमध्ये 25 हजारांची वाढ पाहायला मिळाली आहे. यापूर्वी सोमवारी 1.69 लाख लोक संक्रमित आढळले होते.
देशात आता एकूण 3.60 कोटी लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. ज्यामधून 3.46 कोटी लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत 4 लाख 84 हजार 655 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात मंगळवारी पुन्हा रुग्ण वाढले. सोमवारी राज्यात 33,470 केस आढळले होते. मात्र मंगळवारी हे पुन्हा वाढून 34,424 झाले. गेल्या 24 तासांदरम्यान 22 जणांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे. या दरम्यान राज्यात 18,967 लोक रिकव्हरही झाले आहेत. राज्यात एकूण अॅक्टिव्ह केस वाढून 2.21 लाख झाल्या आहेत. आतापर्यंत राज्यात 69.87 लाख लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये 66.21 लाख बरे झाले आहेत. तर 1.42 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 19% ने कमी होऊन 16% झाला आहे.
मात्र, चांगली बातमी मुंबईतून आहे, जिथे सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मंगळवारी, महानगरात 11,467 नवीन प्रकरणे आणि 2 मृत्यूची नोंद झाली आहे, जी सोमवारी आढळलेल्या 13,648 प्रकरणांपेक्षा कमी आहे. रविवारी महानगरात 19,474 रुग्ण आढळले होते. शनिवारी 20,318 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. आता मुंबईतील एकूण सक्रिय प्रकरणांची संख्या 1 लाख ते 1 लाख 523 वर पोहोचली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.