आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासात 2.67 लाख नवीन प्रकरणे, 398 मृत्यू; केंद्राच्या मंजुरीनंतरही ओडिशात मोलनुपिराविरच्या वापरावर बंदी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात शुक्रवारी 2 लाख 67 हजार 331 नवीन कोरोना संक्रमित आढळले. 1 लाख 22 हजार 311 लोक बरे झाले तर 398 लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह प्रकरणे म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 लाख 44 हजार 662 ची वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या देशात 14.10 लाख अॅक्टिव्ह प्रकरणे आहेत. तिसऱ्या लाटेत अॅक्टिव्ह केस पहिल्यांदा 14 लाखांच्या पार पोहोचल्या आहेत.

तर, नवीन संक्रमितांमध्ये जवळपास 3 हजारांची वाढ झाली आहे. यापूर्वी गुरुवारी 2.64 लाख लोक संक्रमित आढळले होते. देशात आतापर्यंत एकूण 3.68 कोटी लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. ज्यांच्यामधून 3.49 कोटी लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत 4,85,748 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण अॅक्टिव्ह प्रकरणे 31 डिसेंबरला 1 लाख आणि 8 जानेवारीला 5 लाख झाली होती. या हिशोबाने केवळ 15 दिवसांमध्ये एकूण अॅक्टिव्ह केस 14 पट झाले.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 43,211 नवे रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 33,356 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आणि 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2.61 लाख झाली आहे. राज्यात आतापर्यंत 71.24 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 67.17 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1,41,756 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील पॉझिटिव्हिटी रेट 21% आहे.

दरम्यान, ओडिशा सरकारच्या औषध नियामकाने कोरोनाच्या उपचारासाठी मोलनुपिरावीर या औषधाच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घातली आहे. जोपर्यंत हे औषध पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्या वापरावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे राज्य सरकारच्या नियामकाने म्हटले आहे.