आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील एका ओमायक्रॉन रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाले असताना दुसऱ्याच दिवशी राजस्थानातून सकारात्मक वृत्त आले आहे. जयपूरमध्ये सापडलेले ओमायक्रॉनचे सर्व 9 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून शुक्रवारी डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. यातील कुणालाही आता कोरोनाची लक्षणे नाहीत.
सर्व रिपोर्ट्स सामान्य
जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची धास्ती असताना देशात सकारात्मक चित्र दिसत आहे. राजस्थानच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार, नुकतेच ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांच्या कोरोना टेस्टचे निकाल गुरुवारी निगेटिव्ह आले. त्यापैकी कुणातही कोरोनाची लक्षणे सुद्धा नाहीत. त्यांच्या रक्ताचे नमुणे, सीटी स्कॅन आणि इतर रिपोर्ट सुद्धा सामान्य आहेत. तरीही या सर्वांना 7 दिवसांसाठी क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे.
सर्वच राज्यांमध्ये लसीकरणावर भर
ओमायक्रॉनच्या धास्तीने महाराष्ट्रासह गुजरातमध्ये सुद्धा कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी सर्वांवर बंधनकारक करण्याची जबाबदारी स्थानिक आणि जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. त्यातच अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या एका लग्न कार्यात स्थानिक प्रशासनाचे अधिकारी पोहोचले. यावेळी त्यांनी कोरोना प्रोटोकॉलचे पालन होत आहे किंवा नाही याची तपासणी केली. सोबतच, वधू आणि वरासह सर्वांचे व्हॅक्सीन सर्टिफिकेट तपासून पाहिले. विशेष म्हणजे, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले नाही अशा लोकांना त्याच ठिकाणी कोरोना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली.
एकही ओमायक्रॉन रुग्णाचा मृत्यू नाही
कोरोना विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण (जीनोम सिक्वेन्सिंग) करणाऱ्या मुंबईतील 221 रुग्णांमधील नमुन्यांचे निष्कर्ष गुरुवारी जाहीर करण्यात आले. यात डेल्टा व्हेरिएंटचे 24 रुग्ण रुग्ण (11 टक्के), तर डेल्टा डेरिव्हेटिव्हचे 195 रुग्ण (89 टक्के) रुग्ण आढळले आहेत. डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा डेरिव्हेटिव्ह विषाणूचा संसर्ग वेग कमी असल्याचे आढळून आले आहे. ओमायक्रॉन या नवीन विषाणूचे 2 रुग्ण यापूर्वीच आढळून आले आहेत. नमुने संकलित केलेल्या 221 पैकी एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.