आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Omicron Is The Biggest Reason For The Speed Of New Cases Of Corona, 75% Cases In Metro Cities Alone

देशात तिसऱ्या लाटेची चाहूल:महानगरांमध्ये सापडणारी 75% प्रकरणे ओमायक्रॉनची! ओमायक्रॉनमुळेच रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची टास्क फोर्स अध्यक्षांची माहिती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागली आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन याचे सर्वात मोठे कारण आहे. कोविड टास्क फोर्सचे चीफ डॉ. एन के अरोडा यांनी याची पुष्टी केली आहे.

न्यूज चॅनल NDTV सोबत बातचित करताना डॉ. अरोडा यांनी सांगितले की, देशात ओमायक्रॉनचे पहिले प्रकरण गेल्या वर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सापडले होते. यानंतर हे झपाट्याने पसरले. आज जवळपास सर्व राज्यांमध्ये (काही वगळता)ओमायक्रॉनची प्रकरणे आहेत.

सर्वात जास्त चिंता दिल्ली, मुंबई आणि कोलकाता सारख्या महानगरांविषयी आहे. येथे नवीन व्हेरिएंटच्या केसने एकाच महिन्यात वेग पकडला आहे. या शहरांमध्ये ओमायक्रॉनचे एकूण 75% संक्रमित आढळले आहेत. ओमायक्रॉनसह देशभरात कोरोनाचे भरपूर केस देखील झपाट्याने वाढत आहेत. अशा वेळी तिसरी लाट टाळता येऊ शकत नाही.

तिसरी लाट येणे अटळ
डॉ. अरोडा यांनी एनडीटीव्हीसोबत बोलताना सांगितले की, भारतात पहिलेच ओमायक्रॉनचे 1700 केस नोंदवण्यात आल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 510 प्रकरणे आहेत. देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्येही 22% वाढ झाली आहे. गेल्या 4-5 दिवसांमध्ये आलेले रिपोर्टही याकडे इशारा करतात. भारतात स्पष्टपणे तिसरी लाट आली आहे आणि यामध्ये नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन सर्वात जास्त प्रभावी आहे.

एका आठवड्यातच दुप्पट झाला वेग
डॉ. अरोडा यांनी ओमायक्रॉनविषयी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, देशात ज्या व्हेरिएंटची जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आली. त्या हिशोबाने गेल्या आठवड्यात नॅशनल लेव्हलवर सर्व व्हेरिएंटमधून 12% ओमायक्रॉन केस आढळल्या आहेत. मात्र गेल्या आठवड्यात हे प्रमाण 28% पर्यंत पोहोचले. अशा वेळी हे कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत झपाट्याने पसरत आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये हे वाढणे चिंतेची बाब आहे.

मुलांसाठी सुरक्षित आहे लस
डॉ. आरोडा यांनी मुलांच्या लसीवर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांविषयीही भाष्य केले आहे. अरोरा म्हणाले की, मुलांच्या लसीवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. 15 ते 18 वर्षांच्या मुलांच्या मुलांसाठी भारत बायोटेकची स्वदेशी लस कोव्हॅक्सीन पुर्णपणे सुरक्षित आहे. त्यांना कोणतीही एक्सपायरी होत असलेली लस दिली जात नाहीये. डॉ. आरोडा देशाच्या व्हॅक्सीन टॉस्क फोर्सचे देखील प्रमुख आहेत. ते देशात लसीकरण सुरु होण्याच्या नंतरपासूनच या कार्यक्रमाशी संबंधीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...