आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा पुन्हा उद्रेक:देशात मंगळवारी  58,000 प्रकरणे मिळाली, 10 दिवसात 8 पटींनी संक्रमण वाढले; ओमायक्रॉनचे रुग्ण 2 हजारांपेक्षा जास्त

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 58,097 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. मंगळवारी 37,379 संक्रमित आढळले होते. अशा प्रकारे सोमवारच्या तुलनेत संक्रमणात 55% ची वाढ झाली. देशात 26 डिसेंबरला जवळपास 6,531 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. म्हणजेच 10 दिवसांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये 790% ची वाढ झाली आहे.

मंगळवारी देशभरात 15,389 कोरोना रुग्ण रिकव्हर झाले. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 3.43 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली. काल 534 संक्रमितांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांचा आकडा 4.82 लाखांच्या पार गेला आहे. सध्याही 2.14 लाखांपेक्षा जास्त संक्रमितांवर उपचार सुरू आहेत.

भारतात 2 हजारांपेक्षा ओमायक्रॉन रुग्ण
भारतात ओमायक्रॉन संक्रमितांचा आकडा मंगळवारी 2,000 पार पोहोचला. आतापर्यंत देशात एकूण 2,220 ओमायक्रॉन संक्रमितांची पुष्टी झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 272 नवीन रुग्ण समोर आले आहेत. ओमायक्रॉन संक्रमण देशातील 24 राज्यांसह केंद्र शासित प्रदेशांमध्ये पसरले आहे.

राज्यात नवीन व्हेरिएंटचे 653 केस
राज्या नवीन व्हेरिएंटचे सर्वात जास्त 653 संक्रमित आढळले आहेत. दिल्ली 382 संक्रमितांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त केरळ, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये जास्त ओमायक्रॉन केस आढळले आहेत.

दिल्लीत कोरोनाची पाचवी लाट आली
दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, देशात तिसरी आणि दिल्लीत पाचवी लाट आली आहे. असे वाटते की, आज जवळपास 10,000 पॉझिटिव्ह रुग्ण समोर येतील आणि पॉझिटिव्हिटी रेट जवळपास 10% होईल. त्यांनी सांगितले की, दिल्ली सरकारने खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहे की, त्यांनी कोरोना रुग्णांसाठी आरक्षित बेडची संख्या त्यांच्या क्षमतेच्या 10% ने वाढवून 40% करु द्यावी. सरकारी रुग्णालयांमध्ये जवळपास 2% बेड भरलेले आहेत.

देशात आतापर्यंत 1.47 अब्ज डोस देण्यात आले
संपूर्ण देशात कोरोनाविरोधात लसीकरण कँपेन सुरू आहे. आतापर्यंत 1.47 अब्ज डोस देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लसीचे 153.61 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांजवळ अजून लसीचे 19.10 कोटींपेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत.

MP मध्ये दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ
मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांमध्ये 594 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. येथे दररोज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, काल भोपाळच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला की आता भोपाळमध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...