आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओमायक्रॉन या व्हेरिएंटने जगभरात कोरोनाची त्सुनामी आली आहे. त्यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. WHO चे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेद्वारे जगाला इशारा दिला की ओमिक्रॉनमुळे जगभरात लोक मरत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसेच, काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, ओमायक्रॉन कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा कमी घातक आहे.
ओमायक्रॉन जगभरात लोकांचा जीव घेत आहे
WHO प्रमुख टेड्रोस यांनी म्हटले आहे की, ओमायक्रॉन जगभरातील लोकांचा जीव घेत आहे. लसीकरण केलेल्या लोकांसाठी ओमायक्रॉन डेल्टा पेक्षा कमी धोकादायक सिद्ध होत आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तो धोकादायक नाही. यापूर्वीच्या व्हेरिएंट प्रमाणेच ओमायक्रॉन असणारे रुग्णालयात दाखल होत आहेत आणि त्याचा मृत्यू देखील होत आहे.
टेड्रोस म्हणाले की नवीन व्हेरिएंट विक्रमी संख्येने लोकांना संक्रमित करत आहे. हा व्हेरिएंट अनेक देशांमध्ये यापूर्वीच्या डेल्टापेक्षाही झपाट्याने पसरत आहे. कोरोना प्रकरणांची त्सुनामी एवढी मोठी आणि वेगवान आहे की, जगभरातील आरोग्य यंत्रणेला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लसीचे योग्य वाटप न होणे सर्वात मोठी कमतरता
पत्रकार परिषदेदरम्यान डब्ल्यूएचओ प्रमुखांनी लसीच्या असमान वितरणाबाबत चिंता व्यक्त केली. लसीसाठी श्रीमंत देशांच्या लालसेवर ते म्हणाले - लसीचे योग्य वितरण न होणे ही गेल्या वर्षीची सर्वात मोठी कमतरता होती. काही देशांमध्ये, जिथे आवश्यकतेपेक्षा जास्त आरोग्य सुविधा होत्या, तर काही देशांमध्ये कमतरता आहे.
प्रत्येक देशाने सप्टेंबर 2021 पर्यंत आपल्या लोकसंख्येच्या 10% आणि डिसेंबर 2021 पर्यंत 40% लोकसंख्येला लस द्यावी अशी WHO ची इच्छा होती, परंतु 194 पैकी 92 देशांनी लक्ष्य चुकवले. लसीचा अभाव हे त्याचे प्रमुख कारण होते. आता आमचे लक्ष्य आहे की 2022 मध्ये जून-जुलै पर्यंत प्रत्येक देशात 70% लसीकरण पूर्ण होईल. लस तयार करण्याच्या स्थितीत बिघाड झाल्यास, 109 देश पुन्हा या लक्षापासून मागे राहतील.
टेड्रोस म्हणाले - लसीचे असमान वितरण लोक आणि नोकऱ्यांची हत्या करणे आहे. काही देशांमध्ये लोकांना बूस्टर डोस दिल्याने महामारी संपत नाही. कारण अब्जावधी लोकांना अद्यापत लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही.
हनुवटीखाली मास्क घालणे निरुपयोगी
WHO च्या मारिया व्हॅन केरखोव म्हणाल्या - ओमायक्रॉननंतर कोरोना महामारी संपेल अशी शक्यता खूप कमी आहे. महामारी टाळण्यासाठी आपण अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. लोक किती अनौपचारिकपणे फेस मास्क घालतात हे पाहून मला धक्का बसला. मास्क घातल्यावर नाक व तोंड झाकावे लागते. हनुवटीच्या खाली मास्क घालणे निरुपयोगी आहे. WHO च्या क्लिनिकल मॅनेजमेंटच्या प्रमुख जेनेट डियाझ यांनी म्हटले आहे की, प्राथमिक संशोधनात असे दिसून आले आहे की ओमायक्रॉनला डेल्टाच्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा धोका कमी आहे. दरम्यान ओमिक्रॉनबद्दल आतापर्यंत मिळालेला सर्व संशोधन डेटा तरुणांकडून गोळा करण्यात आला आहे. वृद्धांसाठी हा प्रकार किती धोकादायक आहे यावर अधिक संशोधन करावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.