आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्हीके पॉल यांच्या मते, देशाला एक लस प्लॅटफॉर्म विकसित करणे आवश्यक आहे, जो व्हायरसच्या बदलत्या व्हेरिएंटशी जुळवून घेऊ शकेल. कोरोनल ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या प्रसाराविषयीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, डॉ. पॉल यांनी गुरुवारी सांगितले की, भारतातील विषाणू अशा टप्प्याकडे जात आहे ज्यामुळे कमी किंवा मध्यम संक्रमण होत आहे. या स्थितीला स्थानिकीकरण (एंडेमिसिटी)म्हटले जाते.
डॉ. पॉल म्हणाले, 'अशीही परिस्थिती असू शकते की विषाणूंसमोर आपली लस प्रभावी ठरणार नाही. गेल्या तीन आठवड्यांत, ओमायक्रॉनसह आपण अशा परिस्थिती उद्भवलेल्या पाहिल्या आहेत. यापैकी काही प्रकरणे खरेही असू शकतात. आपल्याकडे अद्याप संपूर्ण माहिती नाही, त्यामुळे लसीच्या अकार्यक्षमतेबद्दल निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. मात्र, व्हायरसला हलक्यात घेऊ नका, असा इशाराही त्यांनी दिला.
गरजेनुसार लसींमध्ये बदल करावे लागतील
पॉल म्हणाले की, भारत दरवर्षी फ्लू सारख्या समस्यांना तोंड देत आहे. ते म्हणाले, "आपण किती लवकर अशी लस बनवू शकतो ज्यामध्ये एकच प्लॅटफॉर्मचा वापर असले आणि ती नवीन प्रकारावर प्रभावी ठरणारी असेल. गरजेनुसार लसीत बदल करू शकतो तेव्हा परिस्थितीसाठी आपल्याला स्वतःला तयार करावे लागेल." असे प्रत्येक वेळी तीन महिन्यात होऊ शकत नाही परंतु कदाचित दरवर्षी होऊ शकते."
कोरोनाने शिकवले व्हायरसला हलके घेऊ नका
पॉल म्हणाले की, कोरोनाने हे शिकवले आहे की विषाणूला हलक्यात घेतले जाऊ शकत नाही. आरोग्याबाबत जी अनिश्चितता निर्माण होत आहे, त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की महामारी संपलेली नाही. आपण अनिश्चिततेचा सामना करत राहू.
ओमायक्रॉनची देशात 61 प्रकरणे
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन भारतातही वेगाने पसरत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी सकाळी दिल्लीत 4 नवीन रुग्ण आढळल्यानंतर संध्याकाळी महाराष्ट्रातही 8 नवीन रुग्ण आढळले आहेत. 8 बाधित रुग्णांपैकी 7 मुंबईतील आणि एक वसई-विरारचा आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणीही परदेशात गेले नव्हते. आता देशभरात नवीन प्रकाराची प्रकरणे 61 वर पोहोचली आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.