आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात ओमायक्रॉनमुळे आलेली कोरोनाची तिसरी लाट नियंत्रणाबाहेर चालली आहे. देशात २८ डिसेंबरला फक्त ६,१४७ नवे रुग्ण आढळले होते. गुरुवारी ही संख्या १.१४ लाखावर गेला. म्हणजेच फक्त ११ दिवसांतच रोजचे नवे रुग्ण १७५८% वाढले. महाराष्ट्रात रुग्णसंख्या केवळ तीनच दिवसांत तिप्पट, तर दिल्ली, उत्तर प्रदेश व बिहारमध्ये दुप्पट वाढली. यापूर्वीच्या दोन्ही लाटांत कोणत्याही राज्यात नव्या रुग्णवाढीचा वेग इतका नव्हता. तथापि, दिलासादायक बाब म्हणजे आजवर कोणत्याही राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यात वाढ झालेली नाही. केरळात आधीच झालेल्या मृत्यूंचा आकडा रोज अपडेट केला जात आहे. यामुळे तेथे रोज २७० पेक्षा जास्त रुग्ण नोंदवले जात आहेत. इतर कोणत्याही राज्यात आजवर १५ पेक्षा जास्त मृत्यू होत नाहीत. केरळ वगळता संपूर्ण देशभरात रोज होणाऱ्या मृत्यूंची सरासरी आजवर ५० पेक्षाही कमीच आहे.
अशी स्थिती पूर्वी कधीच नव्हती... कोलकात्यात संसर्गाचा दर ४९.६%, मुंबईत २०.७% झाला
कोरोनाच्या स्थितीचा अंदाज टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटमुळे (संसर्ग दर) लागतो. या हिशेबाने पाहिले तर कोलकात्यात स्थिती सर्वात बिकट आहे. तेथे १०० चाचण्यांत ४९-५० रुग्ण आढळत आहेत. मुंबईतही जवळपास ३० रुग्ण आढळत आहेत.
इटलीहून पंजाबला आलेल्या १७९ पैकी १२५ प्रवासी बाधित : इटलीहून चार्टर्ड फ्लाइटने अमृतसरला आलेले १२५ प्रवासी बाधित आढळले आहेत. विमानात एकूण १७८ लोक होते. विमानात चढण्याआधी सर्व कोरोना निगेटिव्ह होते.
एक्स्पर्ट व्ह्यू : गंभीर रुग्णांनी सध्या काही दिवस घरीच थांबावे
गंभीर आजार असणाऱ्यांसाठी तिसरी लाट खूप धोकादायक ठरू शकते. दिल्लीच्या बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या सीनियर कन्सल्टंट डॉ. मनीषा अरोरा म्हणाल्या, अशा लोकांनी पुढील काही दिवस घरीच थांबले पाहिजे. त्यांना खूप सावधगिरी बाळगावी लागेल.
रक्तदाब : काेरोनाचा संसर्ग झाल्यास संबंधित व्यक्तीचा रक्तदाब अचानक कमी-जास्त होतो. यामुळे सातत्याने बीपीकडे लक्ष दिले पाहिजे.
मधुमेह : कोरोनाची बाधा झाल्यास मधुमेहींची रक्तशर्करा अचानक कमी-जास्त होते. तत्काळ उपचार गरजेचे आहेत. यामुळे शुगर चेक करत राहिली पाहिजे.
श्वसनविकार : फुप्फुसे कमकुवत असलेल्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास ऑक्सिजन देण्याची गरज भासते. श्वास घेण्यात अडचणी आलेल्या रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.