आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Omkareshwar Devotees Rescue Operation; Khandwa Narmada River | Omkareshwar Video

संकट:नर्मदेत अडकले महाराष्ट्रातील भाविक, ओंकारेश्वरमध्ये नदीत स्नान करत होते; अचानक धरणातून पाणी सोडल्याने घाबरले

खांडवा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओंकारेश्वर धरणातून पाणी सोडल्यामुळे नर्मदा नदीत अंघोळ करणारे महाराष्ट्रातील 14 भाविकांसह 20 हून अधिक भाविक अडकलेत. पाण्याचा प्रवाह व वेग वाढल्यामुळे सर्वांनीच घाबरून मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर किनाऱ्यावरील नागरिकांनी त्याची माहिती गोताखोरांना दिली. त्यानंतर दोऱ्यांच्या मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

टीआय बलजितसिंग बिसेन यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 14 तरुण भाविक ओंकारेश्वराच्या दर्शनासाठी आले होते. त्यांच्यासोबत अन्यही काही भाविकही होते. सर्वजण नर्मदेतील दगडांवर स्नान करत होते. अचानक धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पाणी पातळी वाढली. पाण्याचा वेग एवढा जोरात होता की, भाविकांचे पाय डगमगत होते. ते एका दगडाच्या आधाराने उभे राहिले. तिकडे पाणी पातळीही वेगाने वाढत होती.

भाविक वेगवेगळ्या दगडांवर अडकले होते. हा घटनाक्रम घडला तेव्हा नदीत नौकाविहारही सुरू होता. त्यानंतर आलेल्या गोताखोरांनी भाविकांना दोरीच्या मदतीने सुरक्षित किनाऱ्यावर आणले.

खलाशांचा दावा - 40 हून अधिक जणांची सुटका केली

SDM चंदरसिंग सोलंकी यांच्या माहितीनुसार, ओंकारेश्वर विद्युत प्रकल्पाचे 4 टर्बाइन सुरू होते. या टर्बाइनमधून नर्मदेत सकाळी 9 वाजता एका तासाच्या अंतराने प्रथमच पाणी सोडण्यात आले. धरण प्रशासनाने टर्बाइनमधून पाणी सोडल्यानंतर सायरनही वाजवले. पण परराज्यातील भाविकांना स्थानिक परिस्थितीची माहिती नव्हती. त्यामुळे ते नदी पात्रात अडकले. त्यानंतर 20 हून अधिक भाविकांची सुटका करण्यात आली. दुसरीकडे, खलाशांनी 40 हून अधिक भाविकांची सुटका केल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्रातील 14 भाविक नदीत स्नान करत होते. त्यांना बाहेर जाण्याचे सांगण्यात आले. पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर पाणी पातळी वाढल्याने सर्वजण नदीत अडकले.
महाराष्ट्रातील 14 भाविक नदीत स्नान करत होते. त्यांना बाहेर जाण्याचे सांगण्यात आले. पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर पाणी पातळी वाढल्याने सर्वजण नदीत अडकले.

किनाऱ्याकडे जाताना पाणी पातळी वाढली

नदीत अडकलेल्या भगौरा (पाताळपाणी) येथील रवी चौहान यांनी सांगितले की, मी अंघोळ करताना नदीत दूरपर्यंत गेलो. पाणी आल्यानंतर किनाऱ्याच्या दिशेने निघालो. पण पाण्याचा जोर वाढला. त्यामुळे मी नदीच्या मध्यभागी एका दगडावर उभा राहिलो. त्यानंतर मला एका नावेतून किनाऱ्यापर्यंत आणले गेले.

बचाव पथक काय म्हणाले...

भाविकांची सुटका करणाऱ्या बचाव पथकातील विनोद केवट म्हणाले, पाणी कमी असल्यामुळे भाविक दगडांवर बसून अंघोळ करत होते. अचानक ओंकारेश्वर धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नर्मदेची पाणी पातळी वाढली. लोक घाबरले. हात दाखवत मदतीची याचना करत होते. गोताखोर लक्ष्मणने आम्हाला पाठवले. मी, माझा भाऊ शैलू केवट व पुतण्यासह 4 जण बोट घेऊन गेलो. दुसरे लोकही नाव घेऊन आले. सर्वप्रथम आम्ही त्यांना लाईफ जॅकेट व दोरी दिली. त्यानंतर 5-5 जणांना बाहेर काढले.

प्रकाश केवट यांनी सांगितले, लोक वाचवा म्हणून ओरडत होते. ते दगडांवर उभे होते. आम्ही आमची नाव घेऊन गेलो. एकदा 11, दुसऱ्यांदा 7 ते 8 जणांना बाहेर घेऊन आलो.

बचाव पथक बोटीने भाविकांपर्यंत पोहोचले. त्यांना दोरीने सुरक्षित बाहेर काढले.
बचाव पथक बोटीने भाविकांपर्यंत पोहोचले. त्यांना दोरीने सुरक्षित बाहेर काढले.

पाणी सोडण्याची माहिती दिली, पण दुर्लक्ष केले

धरण प्रशासनाने पाणी सोडण्यापूर्वी सायरन वाजवला. त्यानंतर पाणी सोडले. स्थानिक लोकांनीही आवाज देऊन या तरुणांना किनाऱ्यावर बोलावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ते पोहत राहिले. त्यानंतर अचानक नदीची पाणी पातळी वाढली तेव्हा त्यांनी वाचवण्याची विनवणी सुरू केली. खलाशांनी त्यांची सुटका करून त्यांना बाहेर काढले. सर्वजण सुरक्षित आहेत.

भाविक महाकाल लोक पाहिल्यानंतर ओंकारेश्वरला येतात

उज्जैनमधील महाकाल लोक पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. तेच भाविक ओंकारेश्वराच्याही दर्शनाला येत आहेत. सध्या नदीत पाणी कमी आहे. त्यामुळे ते नदीच्या मध्यभागी असलेल्या खडकावर जाऊन बसतात. धरणातून केव्हाही पाणी सोडले जाते.