आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘तुम्ही लोक का घाबरत आहात. काळजीचे काही कारण नाही. मी दोन-तीन तासांत येतो... २०१४ मध्येही मुंबई हृदय शस्त्रक्रियेदरम्यान ६-७ तास लागले होते. तेव्हा काय झाले होते. ही शस्त्रक्रियाही यशस्वी होईल.... पापा लालूंनी शस्त्रक्रियेला जाण्याआधी मला या पद्धतीने आश्वस्त केले. शस्त्रक्रियेनंतर सिंगापूरच्या माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या ओटीतून आयसीयूमध्ये शिफ्ट होताना पापांनी इशाऱ्यानेच हात उचलत म्हटले, सर्व ठीक आहे. यानंतरच माझी चिंता दूर झाली. हॉस्पिटलमधील ते ४-५ तास खूप तणावपूर्ण होते. सकाळी १० ते १२ प्रथम डोनर दीदी रोहिणी आचार्यची शस्त्रक्रियेदरम्यान किडनी काढण्यात आली. तिचे १ ते ३ वाजेदरम्यान लालूंवर प्रत्यारोपण करण्यात आले. यादरम्यान आई राबडीदेवी, बहीण डॉ. मिसा भारती, मेहुणे शैलेश आणि समरेश यांच्या नजरा ओटीच्या दरवाजावर होत्या. शस्त्रक्रिया चांगली झाल्याचे कळताच राजद समर्थकांना सोशल मीडियावर माहिती दिली. मात्र, आम्ही आई आणि दीदी मिसाने पापांना आयसीयूत पाहिले, जवळ गेलो नाही. ते २-३ दिवस आयसीयूमध्ये राहतील. सिंगापूरमध्ये सकाळी प्रथम रोहिणी, नंतर लालूंची शस्त्रक्रिया झाली. शुद्धीवर येताच लालूंनी रोहिणीबाबत विचारले, नंतर हात उचलत म्हणाले - “सब ठीक बा नू...’
निरोगी दाता एका किडनीनेही सामान्यपणे जगू शकतो : डाॅक्टर आयजीआयएमएसमध्ये मूत्रपिंड विभागाचे प्रमुख डॉ. ओमकुमार यांनी सांगितले की, अवयवदानाबाबत लोकांत का-कू असते. दाता निरोगी असेल, म्हणजे त्याला बीपी, शुगर किंवा कोणता गंभीर आजार नाही आणि त्याच्या दोन्ही किडन्या बरोबरीने कार्यरत असतील तर एक किडनी दान केल्याने नुकसान होत नाही. एका किडनीनेही सामान्य जीवन जगता येते. अनेक लोकांकडे एकच किडनी आहे किंवा जन्मताच एक किडनी आहे. तरीही ते सामान्य आयुष्य जगतात. (शब्दांकन : इंद्रभूषण )
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.