आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चीनसोबत झालेल्या संघर्षावरुन पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. केंद्र सरकार जवानांना प्रत्युत्तर देऊ देत नाही. जवानांना उत्तर देण्यापासून रोखले जात आहे, असे त्या म्हणाल्या.
मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, लडाख आणि अरुणाचलमध्ये चीनने आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे. पण भाजपने काहीही केले नाही. LAC वर आमच्या सैनिकांना मारहाण केली जात आहे आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याची परवानगी नाही. ही खेदजनक स्थिती आहे.
मात्र, या चकमकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार भारतीय जवानांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही आणि कोणीही शहीद झालेले नाही.
भाजपचा पलटवार
माध्यमांशी बोलताना भाजप नेते युधवीर सेठी यांनी मेहबुबा मुफ्ती यांचे वक्तव्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. मेहबुबा यांनी या सर्व गोष्टी कुठे ऐकल्या? त्या चीनच्या एजंट आहेत की चीन सरकारच्या प्रवक्ता आहेत? पाकिस्तान असो की चीन, आमच्या सैन्याने सर्वांना पळवून लावलं आहे. आम्हाला जगाचा अभिमान आहे. मग मेहबुबा अशी लज्जास्पद विधाने का करत आहेत?, अशी टीका त्यांनी केली.
जम्मू-काश्मीरमधील लोकांची फसवणूक
आमच्या जमिनी बळकावणाऱ्या चीनला सरकारकडे उत्तर नाही. पण जम्मू-काश्मीरमधील लोकांना भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जमिनी सरकार हिसकावत आहे, असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. काश्मीरमधील जनतेची मोठी फसवणूक होत आहे. सरकार म्हणते ते आमचे नागरिक आहेत, आम्ही त्यांना आमच्यापासून वेगळे करू शकत नाही, तरीही सरकार त्यांची जमीन घेत आहे.
सरकारला लोकांवर नजर ठेवायची आहे
जम्मू-काश्मीरमधील लोकांसाठी युनिक आयडी तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाबाबत मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, सरकारचा लोकांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांना विशेषत: तरुणांवर पाळत ठेवायची आहे. सरकारला तरुणांच्या बोलण्यावर, विचारांवर आणि कृतीवर नियंत्रण ठेवायचे आहे. . 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयामुळे येथील लोक संतप्त झाल्याचे त्यांना वाटते. त्यामुळेच सरकार असे वागत आहे.सरकारने येथे हिंसाचाराचे वातावरण निर्माण केले आहे. त्यांना इथल्या लोकांवर नियंत्रण ठेवायचे आहे आणि त्यांची गळचेपी करायची आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.