आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढलेले वजन कमी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या पंजाबच्या युवा खेळाडू देवांश जग्गाने नित्यनेमाने केलेल्या सरावातून थेट विक्रमाला गवसणी घातली. त्याने गुवाहाटी येथे आयाेजित युवांच्या ३७ व्या एएफआय राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. त्याने १६ वर्षांखालील गटातील थाळीफेकमध्ये विक्रम केला. त्याने यादरम्यान ५७.०१ मीटर थाळीफेक केली. यातून त्याने विक्रमाची नाेंद केली. देवांशने यातून रामनारायणच्या ५३.१७ मीटरच्या विक्रमाला मागे टाकले.
पंजाबच्या देवांशने स्पर्धेत दमदार सुरुवात करताना पहिल्या प्रयत्नात ५५.०२ मीटरपर्यंत थाळीफेक केली. त्यानंतर त्याने तिसऱ्या प्रयत्नात ५५.०३, पाचव्या प्रयत्नात ५५.९८ आणि शेवटच्या प्रयत्नात ५७.०१ मीटरचे अंतर गाठले. यासह त्याला सुवर्णपदकाचा बहुमान मिळवता आला. त्याची या स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली.
देवांशने वयाच्या ११ व्या वर्षी वाढलेले वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ताे नित्यनेमाने मैदानावर वाॅक करू लागला. त्यानंतर इतर अॅक्टिव्हिटीही त्याने सुरू केल्या. यादरम्यान त्याने मित्रासाेबत थाळीफेक केली. यामध्ये त्याला आवड निर्माण झाली. नित्याच्या सरावातून त्याने थाळीफेकमध्ये दर्जेदार कामगिरी केली. यामुळे प्रशिक्षक हकीम यांनी देवांशला यामध्येच सर्वाेत्तम कामगिरी करण्याचा सल्ला दिला. तसेच थाळीफेकमध्ये माेठे यश संपादन करू शकताे, असा सल्लाही दिला. त्यानंतर देवांश नित्यनेमाने थाळीफेकचा सराव करू लागला.
यादरम्यान त्याने ऑनलाइनही प्रशिक्षण घेतले. काेच हकीम यांनी त्याला याबाबतचे अनेक व्हिडिओ पाठवले. त्यामुळे त्याला आपल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यास मदत झाली. आता त्याने गुवाहाटी येथील युवांच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नाेंदवला. यादरम्यान ताे सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने आतापर्यंत राज्य स्पर्धेतही पदकांची कमाई केली आहे. आता त्याची नजर आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे लागली आहे. यादरम्यानही विक्रमाला गवसणी घालण्याचा निर्धार केला असल्याचे त्याने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.