आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२००७ मध्ये खेळाडू म्हणूनही संघात निवड झाली नव्हती. त्यावेळी ग्रेग चॅपेल भारतीय संघाचे कोच होते आणि आता मी कर्णधार म्हणून योग्य नाही असे त्यांना वाटत होते. एका रविवारी सकाळी वडील माझ्याजवळ आले आणि म्हणाले, की तू खूप खेळला आहेस, जवळपास ३५० सामने खेळलेस. आता तू एकही सामना नाही खेळला नाहीस किंवा खेळलास तरी काहीही फरक पडणार नाही. तू जी कामगिरी केली आहेस त्याच्या बळावर तुझे नाव क्रिकेटच्या इतिहासात कोरले गेले आहे.
मी त्या दिवशी त्यांना काहीही म्हणालो नाही. दोन-तीन दिवसांनंतर वडील पुन्हा माझ्याजवळ आले आणि विचारले, काय ठरवले आहेस? भारतीय संघाच्या प्रत्येक विजयाबरोबर तुझ्या पुनरागमनाची शक्यता धूसर होत आहे, हे दररोज वर्तमानपत्रांत वाचून मला वाईट वाटते. काही दिवसांनंतर मी त्यांना म्हणालो, मला आणखी खेळायचे आहे. मला एक प्रयत्न करायचा आहे कारण मी ४० वर्षांचा होईन त्यावेळी मला स्वत:ला असे सांगायला लागू नये, की सौरभ कठीण परिस्थितीसमोर तू गुडघे टेकले. तो काळ मी घालवला आणि भारतीय संघात पुनरागमन केले. पुन्हा मी पाच वर्षे खेळलो. मी खेळायचे बंद केले त्यावेळी माझा अत्यंत चांगला मित्र सचिन तेंडुलकर म्हणाला होता, की सौरभ, मी तुझा सर्वात चांगला खेळ गेल्या चार-पाच वर्षांत पाहिले. मी हा किस्सा आपल्याला यासाठी सांगतोय की यशासोबत अपयश येते. अनेकवेळा याचा स्वीकार करणे कठीण असते.
तुम्हाला स्पर्धेतून बाहेर केले जाते त्यावेळी तुम्हाला तुमच्या सर्वोत्तमाची जाणीव होते. सर्व आधार सरकतात त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम शोधू शकता. मीही आज हे मानतो की, ती चार-पाच वर्षे माझ्या जीवनातील सर्वात चांगली होती. कारण मला कल्पना होती की, मी पुढचा सामना तेव्हाच खेळू शकेन जेव्हा या सामन्यात चांगली कामगिरी करीन. जग निष्ठूर असते, हे आपण कधीही विसरू नये. यशस्वी होण्याचा मार्ग तुम्हाला माहीत नसेल तर यश मिळणार नाही आणि अपयश वाट्याला नाही आले तर यशाची किंमत कळणार नाही. मला अलीकडेच कुणीतरी विचारले की आता जीवन कसे आहे. मी म्हणालो, चांगले आहे. सामन्याच्या दिवशी सकाळी साडेसातला उठल्यानंतर विचार करायचो की आज माझी परीक्षा आहे आणि सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळळेल्या असणार.. तशा सकाळ मात्र आता मी गमावल्या आहेत. आयुष्यात चढ-उतार आवश्यक आहेत. त्यासाठी तणाव असणे अत्यंत गरजेचे आहे.
तणाव अशी गोष्ट आहे की, त्याची तुम्हाला सवय होते, हे मी पैजेवर सांगू शकतो. दोन-तीन वर्षांत तुम्हाला याची सवय हाेते. मग तुम्ही त्याचा आनंद घ्यायला लागता कारण तुमची सिस्टीम, तुमचे शरीर त्याच्या अनुरूप होऊन जाते. तणाव संपल्यानंतरच तुम्हाला त्याचे महत्त्व कळते, तो किती आव्हानात्मक, आनंद देणारा, संतुष्ट करणारा होता, हेही कळते.
(२०१७ मध्ये एका कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरभ गांगुली. बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडण्याच्या अफवांमुळे ते चर्चेत आहेत)
अपयशाचाही स्वीकार करा
प्रत्येक दिवस चांगला नसतो, हे सत्य स्वीकारले पाहिजे.
चुका होतील, पण जीवन थांबणार नाही, ते सुरूच राहील.
अपयश आल्याशिवाय यशाची किंमत कळणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.