आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • One Family One Ticket To Soft Hindutva; Hope For Revival Of Congress From The Fourth Chintan Shibir Led By Sonia, Latest News And Update

चिंतनातून दूर होईल काँग्रेसची चिंता?:एक कुटुंब-एक तिकीट ते सॉफ्ट हिंदुत्व; सोनियांच्या नेतृत्वातील चौथ्या चिंतनातून काँग्रेसला संजीवनीची आशा

उदयपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

22 राज्यांतील विधानसभा व 2 राज्यांतील लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेसचे उदयपूरमध्ये चिंतन शिबिर सुरू झाले आहे. काँग्रेसचे हे पहिलेच शिबिर नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वातील हे तब्बल चौथे शिबिर आहे. त्यात पक्षात एक कुटुंब-एक तिकीट फॉर्म्युला लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय सर्वच प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्षांसाठी यात एक ठराविक टर्मही निश्चित करण्यात आली आहे. या शिबिरात पक्षशिस्तीविषयीही कठोर निर्णय घेतले जाणार आहेत.

विशेष बाब म्हणजे गांधी कुटूंबाला या दोन्ही कठोर नियमांत सूट देण्यात आली आहे. सोनियांनी आपल्या प्रारंभिक भाषणात पक्षाच्या बड्या नेत्यांना पक्षाचे ऋण फेडण्यासाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून पक्षासाठी काम करण्याचे आवाहन केले. त्यांच्या भाषणानंतर उदयपूरपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय वर्तुळात उदयपूरच्या शिबिरातून काँग्रेसचा पुन्हा उदय होईल काय? हा एकमेव प्रश्न चर्चिला जात आहे.

सत्तेसाठी सॉफ्ट हिंदुत्वाचा फॉर्म्युला

काँग्रेसच्या सार्वजनिक कार्यक्रमात प्रथमच माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. 2004 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर प्रथमच पक्षाने त्यांना पुन्हा स्थान दिले आहे. गांधी कुटूंबाचे निकटवर्तीय मणीशंकर अय्यर यांनी 2011 मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात बाबरी विध्वंसातील राव यांच्या कथित भूमिकेमुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यापासून अंतर राखल्याचे स्पष्ट केले होते.

उदयपूरच्या चिंतन शिबिरात प्रथमच माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. राव 1991 ते 1996 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते.
उदयपूरच्या चिंतन शिबिरात प्रथमच माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे पोस्टर लावण्यात आले आहे. राव 1991 ते 1996 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते.

कार्यक्रमस्थळी नरसिंह राव यांचे पोस्टर लावल्यामुळे काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकल्याचे स्पष्ट होते. राव बाबरी विध्वंसावेळी भारताचे पंतप्रधान होते. गत काही वर्षांत राहुल गांधीही या रणनितीवर वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. राहुल नेहमीच हिंदू व हिंदुत्वावर भाष्यही करतात.

काँग्रेस संघटनेत गांधी कुटूंबाला मिळणार ताकद

सातत्याने अंतर्गत कलहाचा सामना करणाऱ्या गांधी कुटूंबालाही या चिंतन शिबिरातून बळ मिळेल. निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात मोठे घमासान माजले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या शिबिरात काँग्रेसच्या जी-23 या बंडखोर गटाचे नेतेही सहभागी जालेत. त्यामुळे शिबिरानंतर पुन्हा एकदा गांधी कुटूंहब पक्षाच्या केंद्रस्थानी असेल असे मानले जात आहे. शिबिरात राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष करण्याची मागणीही होऊ शकते. यंदाच काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानतंर सोनियांनी सीडब्ल्यूसीच्या बैठकीत आपल्या राजीनाम्याचा प्रस्तावही ठेवला होता.
5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानतंर सोनियांनी सीडब्ल्यूसीच्या बैठकीत आपल्या राजीनाम्याचा प्रस्तावही ठेवला होता.

उदयपूर चिंतनाद्वारे काँग्रेसचा नवसंकल्प

काँग्रेसने या चिंतन शिबिराला नवसंकल्प असे नाव दिले आहे. त्यात शेती, शेतकरी, रोजगार, राष्ट्रीय सुरक्षा, दलित-आदिवासींवरील अत्याचार रोखण्यासह 6 मुद्यांवर प्रस्ताव सादर केला होता. हे प्रस्ताव अंमलात आणण्याचा संकल्प शिबिरात घेतला जाईल.

चला जाणून घेऊया सोनियांच्या नेतृत्वात यापूर्वी झालेल्या 3 चिंतन शिबिरांची माहिती...

2013 : जयपूर चिंतनात राहुल एके राहुल
2013 मध्ये केंद्रीय सत्तेत असताना काँग्रेसचे जयपुरात चिंतन शिबिर झाले होते. अन्ना आंदोलन, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाबसह अनेक राज्यांतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे हे चिंतन शिबिर झाले होते. पण, या शिबिरात चिंतनाऐवजी राहुल यांचाच उदोउदो करण्यात आला होता. विशेषतः सरचिटणीसपदी काम करणाऱ्या राहुल यांना पक्ष उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचा निर्णयही या शिबिरात घेण्यात आला होता.

जयपूरच्या चिंतन शिबिरात राहुल गांधींनी भावूक भाषण दिले होते. राहुल यांनी आपल्या भाषणात सत्तेची तुलना विषाशी केली होती.
जयपूरच्या चिंतन शिबिरात राहुल गांधींनी भावूक भाषण दिले होते. राहुल यांनी आपल्या भाषणात सत्तेची तुलना विषाशी केली होती.

2004 : शिमला शिबिरात UPA स्थापन करण्याचा फैसला

2004 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या शिमल्यातील चिंतन शिबिरात काँग्रेसने समविचारी पक्षांची संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीए स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा पक्षाला मोठा फायदा झाला. त्यानंतर काँग्रेसने 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या शायनिंग इंडियाची हवा काढत केंद्रात सत्ता स्थापन केली होती.

शिमला चिंतन शिबिरात काँग्रेसने देशभर आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याची जबाबदारी प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंह व अहमद पटेल यांच्यावर सोपवण्यात आली होती.
शिमला चिंतन शिबिरात काँग्रेसने देशभर आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याची जबाबदारी प्रणव मुखर्जी, अर्जुन सिंह व अहमद पटेल यांच्यावर सोपवण्यात आली होती.

1998 : सोनियांच्या नेतृत्वात पहिले चिंतन शिबिर

राजीव गांधी यांच्या हत्येनंतर 7 वर्षांनी काँग्रेस संघटनेत गांधी कुटूंबाचे पुनरागमन झाले. त्यावेळी सीताराम केसरी यांना हटवून सोनिया गांधींकडे पक्षाची सूत्रे सोपवण्यात आली होती. 1998 मध्ये सोनियांनी मध्य प्रदेशच्या पाचमढी येथे काँग्रेस नेत्यांना एकजूट करुन चिंतन शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात आघाड्यांनी त्रस्त झालेल्या काँग्रेसने एकला चलोरेची भूमिका घेतली होती. या शिबिरात काँग्रेसने पंचायती राजविषयी 14 कलमी योजना, शे्तीशी संबंधित 8 सूत्री योजना, जातीयवादाचा वाढता धोका व भाजपच्या वाढता प्रभाव रोखण्याची विस्तृत योजना सादर केली होती.

बातम्या आणखी आहेत...