आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • MBBS Update | Medical Education Udpate | One Lakh New Specialist Doctors In The Country Every Year; Blueprint Of Union Ministry Of Health And Ministry Of Finance Prepared | Marathi News

MBBS एवढ्या PG जागा:देशात आता दरवर्षी एक लाख नवे तज्ज्ञ डॉक्टर; आरोग्य मंत्रालय व वित्त मंत्रालयाची ब्ल्यूप्रिंट तयार

नवी दिल्ली / पवन कुमार16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ सर्दी-पडशामध्येही लोक आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेऊ इच्छित आहेत. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने दरवर्षी दुप्पट तज्ज्ञ डॉक्टर तयार करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. यासाठी देशातील एमबीबीएसच्या जागा फारशा वाढवल्या जाणार नाहीत, मात्र पीजीच्या जागा जागा दुप्पट करून त्या एमबीबीएसच्या बरोबरीने केल्या जातील. सध्या देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या एकूण जागा ९१,२२७ आहेत, ज्या १.१० लाखांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. तितक्याच जागा पीजीसाठी असतील, ज्या सध्या ५५ हजार आहेत. परंतु, अपेक्षित विषय मिळत नसल्याने ५० हजार जागाही भरल्या जात नाहीत. पण, आता पीजीच्या जागा वाढवल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला एमबीबीएस उत्तीर्ण झाल्यानंतर पीजी करण्याची संधी मिळणार आहे. नीती आयोग, आरोग्य मंत्रालयाचे राष्ट्रीय परीक्षा मंडळ आणि वित्त मंत्रालयाने या योजनेची ब्ल्यूप्रिंट तयार करण्यास सुरुवात केली आहे.

सध्या देशातील सरकारी रुग्णालयांत तज्ज्ञांची ८०% पदे रिक्त : देशातील सरकारी रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची ८०% पदे रिक्त आहेत. सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये (CHC) स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांची ६९% पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, शस्त्रक्रिया विभागात ७८.८५%, बालरोग विभागात ७८% पदे रिक्त आहेत. देशातील १९ एम्समध्ये प्राध्यापकांची २,२२७ पदे, वरिष्ठ रेसिडेंची १,०३६ पदे आणि कनिष्ठ रेसिडेंटची ३४५ पदे भरलेली नाहीत. पीजीच्या जागा दुप्पट झाल्यास येत्या ५-७ वर्षांत देशातील तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता दूर होईल, असा केंद्र सरकारचा अंदाज आहे. यासाठी सरकारी रुग्णालयांमध्ये पीजीच्या जागा वाढवल्या जातील, त्याचप्रमाणे मोठ्या खासगी रुग्णालयांमध्ये डीएनबी कोर्सद्वारे तज्ज्ञ डॉक्टर तयार केले जातील.

१०० पेक्षा जास्त खाटा असलेल्या हॉस्पिटलमध्ये डीएनबी कोर्स
खासगी रुग्णालयांव्यतिरिक्त, ईएसआयसी, आर्मी आणि पीएसयू रुग्णालयांना देखील पीजी अभ्यासक्रमासाठी समाविष्ट केले जाईल. १०० पेक्षा जास्त खाटा असलेल्या हॉस्पिटलमध्ये डीएनबी कोर्सला परवानगी असेल. यात २ वर्षांचा डिप्लोमा व ३ वर्षांचा डीएनबी कोर्स असेल. डीएनबी पदवीधारकांना अध्यापन संवर्गात समाविष्ट केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...