आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • One Lakh Portable Oxygen Concentrators Will Be Procured From The Center, Procured From The Prime Minister's Relief Fund

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरेंद्र मोदी यांची घोषणा:एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर केंद्र खरेदी करणार, पंतप्रधान मदत निधीतून होणार खरेदी

नवी दिल्ली/मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व नवीन प्रकल्पांचा स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे विकास करणार

केंद्र सरकार पंतप्रधान मदत निधीतून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरेदी करणार आहे. त्यासोबतच आणखी ऑक्सिजन प्रकल्प उभारले जातील. हे नवे ऑक्सिजन प्रकल्प आधी घोषित ७१३ ऑक्सिजन प्रकल्पांपेक्षा वेगळे असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ही घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, ‘त्यामुळे जिल्हा मुख्यालये आणि टियर-२ शहरांत ऑक्सिजन वाहतुकीची समस्या संपुष्टात येईल.’

पंतप्रधान कार्यालयानुसार, कॉन्सन्ट्रेटर व पीएसए प्लँटमधून ऑक्सिजनचा पुरवठा सुनिश्चित होईल. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याच्या गरजेवर चर्चा झाली. मोदींनी कॉन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करण्याचे व ते गरजू राज्यांना देण्याचे निर्देश दिले. पीएमओनुसार, पीएम केअर्स फंडातून ७१३ पीएसए ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आता या फंडातून आणखी ५०० ऑक्सिजन प्रकल्प उभे केले जातील.

सर्व नवीन प्रकल्पांचा स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे विकास करणार
नवे ५०० पीएसए ऑक्सिजन प्रकल्प संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) स्वदेशी तंत्रज्ञानाद्वारे विकसित करतील. त्यांची स्थापना देशातील कंपनीद्वारे केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...