आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी मतदान झाल्यानंतर आता सर्व पक्षांनी ५ डिसेंबरच्या मतदानासाठी उत्तर व मध्य-पूर्व गुजरातच्या ९३ जागांसाठी नव्या धोरणावर काम सुरू केले आहे. उत्तर गुजरातेत ३२ व मध्य-पूर्व गुजरातेत ६१ जागा आहेत. २०१७ मध्ये या भागांत ७०.७६% मतदान झाले होते.
वस्तुत: दक्षिण गुजरात व सौराष्ट्र-कच्छमध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानाने सर्व पक्षांचा तणाव वाढवला आहे. भाजपही चिंतित दिसत आहे. पक्षाच्या आकलनानुसार १२ ते १५ जागांवर जय-पराजयाचे मार्जिन कमी होऊ शकते. अशा वेळी शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदारांना बूथपर्यंत घेऊन या, असा संदेश पक्षाने कार्यकर्त्यांना पाठवला आहे. अनेक आंदोलने करूनही भाजपला या भागात २०१२ च्या तुलनेत एका जागेचे नुकसान झाले होते. पक्षाने ५१ जागांवर विजय मिळवला होता. या टप्प्यात लढाई भाजप विरुद्ध काँग्रेसच आहे. आम आदमी पक्षाचा प्रभाव या टप्प्यात काही जागांपर्यंतच मर्यादीत दिसत आहे. विशेष म्हणजे याच भागात मोदी व शहांचे गृहनगरही येतात. २००२ च्या दंगलीत हेच क्षेत्र सर्वाधिक होरपळले होते.
प्रचार कसा : भाजपचा ‘सन्मान’वर, तर काँग्रेसचा ‘सायलेंट’ मॉडेलवर विश्वास भाजप : भाजपने प्रचाराला गुजरातची अस्मिता, गुजरात पुत्राचा सन्मान आणि शांततेशी जोडले आहे. गांधी परिवाराला खूश करण्यासाठी काँग्रेस माझ्याबद्दल अपशब्द वापरू लागल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. गुजरात पुत्राचा अपमान, गुजरातचा अपमान, असे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी त्यांच्या कांकरेज,पाटन, सौजित्र येथे सभा घेतल्या.अहमदाबादेत रोड-शो झाला.
काँग्रेस : पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी धुरा घेतली आहे. काँग्रेसचा प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातही सायलेंट मॉडेलवर भर आहे. समाजात बैठकांचा सपाटा लावला आहे. सलग २७ वर्षे सत्तेबाहेर असूनही काँग्रेस बळकट राहिली. येथे ठाकोर समुदायाचे अनेक प्रस्थापित चेहरे आहेत.दुसऱ्या टप्प्यात १३ जागा एसटी वर्गासाठी राखीव आहेत.
९३ पैकी भाजपची ६३ तर काँग्रेसची ६२ नव्या चेहऱ्यांना संधी {९३ जागांच्या या टप्प्यात भाजपने ६३ नवे उमेदवार उतरवले. ३० उमेदवारांना पुन्हा तिकिट दिले आहे. २१ आमदारांचे तिकिट मात्र कापण्यात आले. {काँग्रेसचे ६२ नवीन चेहरे रिंगणात आहेत. ३८ पैकी २८ आमदारांना पुन्हा तिकिट मिळाले. पाच आमदार भाजपमध्ये गेले होते. तीन जागा राष्ट्रवादीला दिल्या आहेत.
२ निवडणूक : काँग्रेसच्या जागा कायम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.