आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • One Person Make Infected 100, Another Hotspot; 400 District No Patients: Policy Commission

जयपूर:एका व्यक्तीमुळे 100 जण बाधित, दुसरा हॉटस्पॉट; 400 जिल्ह्यांत एकही रुग्ण नाही : नीती आयोग

जयपूर / पाटणा3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
छायाचित्र जुन्या जयपूर शहरातील आहे. महिला पोलिसांनी गुरुवारी निर्भया पथकासह संचलन करून लोकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. - Divya Marathi
छायाचित्र जुन्या जयपूर शहरातील आहे. महिला पोलिसांनी गुरुवारी निर्भया पथकासह संचलन करून लोकांना घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.
  • बिहारच्या सिवानमध्ये गुरूवारी १० कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले

राजस्थानातील जयपूरचा रामगंज हा कोरोना विषाणूचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. जुन्या जयपूर शहरात आतापर्यंत किमान १०० रुग्ण समोर आले आहेत. एका व्यक्तीमुळे थेट १७ जण बाधित झाले. त्यात कुटुंबातील ११ जणांचा समावेश होता. तो व्यक्ती दुचाकीवरून मित्रासमवेत भटकला होता. उर्वरित रुग्ण रामगंज या गजबजलेल्या वसाहतीमधील नागरिक आहेत. 

महिलेने केला प्रादुर्भाव

बिहारच्या सिवानमध्ये गुरूवारी १० कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे बिहारमधील बाधितांची संख्या ५१ वर गेली आहे. त्यापैकी २० सिवानचे आहेत. त्यात २० पैकी ९ रुग्णांना एका महिलेमुळे संसर्ग झाला. ते सर्व एकाच कुटुंबातील आहेत. महिला आेमानहून आली होती. ७ एप्रिल रोजी संसर्ग झाल्याचे उघड झाले. दरम्यान, नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी देशातील कोरोना संसर्गाबद्दलची माहिती जाहीर केली. ते म्हणाले, देशात एकूण रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण ६२ जिल्ह्यांतील आहेत. बहुतांश रुग्ण क्लस्टरच्या रुपात समोर येत आहेत. देशातील ४०० जिल्ह्यांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 

बातम्या आणखी आहेत...