आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Onion Prices Down । Central Government Launches 1 Lakh Tonnes Of Onion For Sale In Buffer Stock

कांद्याचे दर कमी होणार?:केंद्र सरकारने बाजारात आणला बफर स्टॉकमधला 1 लाख टन विक्रीसाठी कांदा, ग्राहकांना 5 ते 12 रुपयांपर्यंत मिळणार चांगल्या प्रतिचा कांदा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल-डिझेल पाठोपाठच आता कांदा देखील स्वस्त होणार आहे. कारण केंद्र सरकार आपला बफर स्टॉकमधला 1 लाख टनांपेक्षा जास्त कांदा बाजारात विक्रीसाठी आणणार आहे. त्यामुळे कांद्याचे भाव आता कमी होऱ्याची दाट शक्यता आहे.

गेल्या काही दिवासांपुर्वी कांद्याचे दर 50 ते 60 रुपये प्रतिकिलोवर गेले होते. सध्या बाजारात चांगल्या प्रतिचा कांदा 40 ते 45 रुपये किलोने विकला जात आहे. मात्र आता बफर स्टॉक आल्यानंतर कांद्याचे दर कमी होणार असल्याचे जाणकार बोलत आहेत.

केंद्र सरकारने आतापर्यंत देशभरातील बाजारपेठांमध्ये आपल्या बफर स्टॉकमधून फक्त 1.11 लाख कांदा विक्रीसाठी बाहेर काढला आहे. त्यामुळे हा कांदा आता 5 ते 12 रुपयांच्या आसपास ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे की, "बफर स्टॉकमार्फत कांद्याच्या किंमती स्थिर करण्यात येत आहेत. कांद्याच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे आता परिणाम समोर आले आहेत." कांद्याच्या किंमती गेल्या वर्षाच्या तुलनेत काहीशा स्वत: आहेत. किरकोळ बाजारात कांदा 40.13 रुपयांपर्यंत तर घाऊक बाजारात 31.15 रुपयांनी मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...