आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कांदा साठा:व्यापाऱ्यांवर कांदा साठ्याची मर्यादा; ठोकसाठी 25 टन, किरकोळ 2 टन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा घातली. आता ठोक व्यापारी कमाल २५ टन, किरकोळ व्यापारी कमाल दोन टन कांदा साठवू शकतील. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार, कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही साठा मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत राहील.

प्राइस वॉटर हाऊस कूपर्सचे कृषितज्ञ अजय काकरा यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, कांद्यावर साठा मर्यादा घातल्याने साठेबाजीला आळा बसेल. सामान्यपणे कुठल्याही वस्तूंचे दर वाढताच व्यापारी साठा करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे दर आणखी वाढतात.