आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Online Change Of Address In Aadhaar Is Possible With The Consent Of The Head Of The Family

ऑनलाइन पत्ता अपडेट केला जाऊ शकेल:कुटुंबप्रमुखाच्या सहमतीने ‘आधार’मध्ये ऑनलाइन पत्ता बदलणे शक्य

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंबप्रमुखाच्या सहमतीने आता आधार कार्डवरील ऑनलाइन पत्ता अपडेट केला जाऊ शकेल. यूआयडीएआय प्राधिकरण म्हणाले, प्रमुखाशी संबंध दर्शवणारा दस्तऐवज रेशन कार्ड, गुणपत्रिका, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट आदी जमा करून पत्ता ऑनलाइन अपडेट करता येईल. कुणाकडे असा दस्ताऐवज नसेल तर तो प्रमुखाचे स्व-घोषणापत्र जमा करू शकतो.

ज्यांच्याकडे स्वत:च्या नावाचा दस्ताऐवज नाही, अशा मुले, पत्नी किंवा आई-वडील आदी जवळच्या नातेवाइकांसाठी ही नवी सुविधा फायदेशीर ठरेल. ‘माय आधार’ पोर्टलवर पत्त्यात बदल करता येईल. यासाठी ५० रुपये शुल्क द्यावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...