आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑनलाइन क्लासमुळे मुले शिक्षणाबाबत उदासीन होत आहेत, शाळेबाबत मुलांमधील उत्साह संपत आहे. सर्वकाही ऑटो मोडमध्ये सुरू आहे, आळस वाढला आहे. ८०% मुलांची झोपण्या-उठण्याची, अंघोळ-ब्रशचा रोजची दिनचर्या बिघडली आहे. त्यांना ऑनलाइन क्लासमुळे मिळालेली ढिलाई आवडत आहे. विशेषत: ८ वीपर्यंतच्या मुलांत ही प्रवृत्ती जास्त आहे. सीबीएसईच्या स्टुडंट हेल्पलाइनच्या प्रमुख समुपदेशक गीतांजली कुमार यांनी सांगितले की, माझ्याकडे येणारे दर १० पैकी ८ पालक याच विषयावर बोलत आहेत. पालक आणि मुलांमध्ये वाद, चिडचिड ही आता प्रत्येक घरातील कथा झाली आहे.
कोरोनामुळे या आठवड्यात देशभरात दुसरे शैक्षणिक सत्र सुरू झाले, त्यात ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. गेल्या सत्रात शाळेत न जाताच सर्व मुलांना पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे. गीतांजली म्हणाल्या की, मुलांमध्ये शाळेबाबत उत्साह नाही. काही मुलांना तर शाळेत जाण्याची इच्छाच नाही. त्यांना हा आराम आवडत आहे. शिस्त कमी झाली आहे. वेळापत्रकाचे पालन, नियमित दिनचर्या बिघडली आहे. मुले आळशी होत आहेत. लहानपणातील ही वर्षे आयुष्याचा पाया असतात. सध्या तोच कमकुवत होत आहे.
नॅशनल प्रोग्रेसिव्ह स्कूल काॅन्फरन्सचे माजी अध्यक्ष आणि एहल्कॉन इंटरनॅशनल स्कूलचे संचालक डॉ. अशोक पांडेय म्हणाले की, गेल्या वर्षी शैक्षणिक नुकसान झाले, त्याचे दूरगामी परिणाम होतील. आता ही हानी वाढत आहे. भविष्यात त्याची भरपाई कशी होईल, हा चिंतेचा विषय आहे. अस्वस्थतेचा काळ संपण्याचे नावच घेत नाही. त्याचा परिणाम मेंदूवरही होतो. मुलांच्या मनावर आणि आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ नये यासाठी मुलांची मन:स्थिती चांगली राहावी, त्यात बदल होत असेल तर कठोर प्रतिक्रिया देऊ नये. नातेवाईक आणि मित्रांशी बोलून समस्येवर उपाय शोधणे ही पालक आणि शिक्षकांची जबाबदारी आहे.
मुलांमधील कंटाळा घालवण्यासाठी त्यांच्या आवडीला प्रोत्साहन द्या : तज्ज्ञ
प्रख्यात मनोवैज्ञानिक डॉ. समीर पारीख म्हणाले की, मुलांनी ही स्थिती मोठ्यांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे हाताळली. अचानक ऑनलाइन शिक्षणात शिफ्ट होणे सोपे नव्हते, ना शिक्षकांसाठी ना मुलांसाठी, पण सर्वांनी ते स्वीकारले. शाळेतील शिक्षणाच्या तुलनेत ते चांगले नाही, पण झीरो तर राहिले नाहीत. स्थिती आपल्या नियंत्रणात नव्हती. त्यामुळे त्याच्या सकारात्मक पैलूकडे पाहायला हवे. ते आवश्यक आहे कारण कोविड तर आताही आहे. आपल्याला मुलांवर दबाव टाकायचा नाही. त्यांचा मूड बदलला असेल, कधी निराशा वा चिडचिडेपणा दिसला तरी घाबरू नका, हे स्वाभाविक आहे. त्यांच्यासोबत खेळा, शारीरिक अॅक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करा. कला, संगीत, लेखन, वाचन, नृत्य, अभिनय यांसारख्या त्यांच्या छंदाला, आवडीला प्रोत्साहन द्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.