आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Online Monitoring Of Highway bridges, Action As Soon As Quality Deteriorates, IIT Jodhpur, NHAI's Software Development

नवोन्मेष:हायवे-ब्रिजवर ऑनलाइन निगराणी ठेवणार, दर्जा बिघडताच कारवाई, आयआयटी जोधपूर, एनएचएआयची सॉफ्टवेअर निर्मिती

मनोजकुमार पुरोहित |जोधपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या राष्ट्रीय महामार्गावरील पूल आणि रस्ते आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यासोबत त्याच्या ऑनलाइन निगराणीसाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थ जोधपूर(आयआयटी) सॉफ्टवेअरवर काम करत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. आयआयटी व एनएचएआय यांच्यात याबाबत दोन वर्षांपूर्वी सामंजस्य करार झाला होता.

राष्ट्रीय महामार्गाच्या आराखड्याच्या हेल्थ मॉनिटरिंगचे काम होईल. आयआयटी जोधपूरचे संचालक प्रा.शंतनू चौधरी व एनएचएआय(पीआययू) जोधपूरचे अजय बिश्नोई जी.एम.(तंत्रज्ञान) आणि योजना संचालकांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारांतर्गत आयआयटीने बरेच काम केले असून त्याला लवकरच मूर्त स्वरूप दिले जाईल. पुलातील व्हायब्रेशन सेन्सरने पुलावरील वाहतुकीच्या अंदाजासह स्थितीची निगराणी होईल. हे सेन्सर आयआयटीत तयार होणाऱ्या सॉफ्टवेअरशी जोडले जाईल. पुलाची फिटिंग, दुरुस्तीची माहिती मिळू शकेल.

पूल व रस्त्यांच्या पायाभूत सुविधांवर काम करणार
आयआयटीची रिसर्च टीम पूल आणि रस्त्यांसाठी पायाभूत सुविधांवर काम करेल. दर्जेदार पूल बांधण्यातील समस्या पाहिली जाईल. रस्त्याचा टिकाऊपणा वाढेल. आयआयटी जोधपूर स्मार्ट, बळकट व पायाभूत सुविधेवर बरेच काम करत आहे. एनएचएआयची मदत घेतली जाईल.

बातम्या आणखी आहेत...