आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Online Shopping News, Flifcart Company Said Returns Are Not Possible, Latest News And Update News

लॅपटॉप मागवला, पाकिटात साबण आला:IIM अहमदाबादच्या विद्यार्थ्याची फ्लिपकार्टकडे तक्रार; कंपनी म्हणाली- आता रिटर्न घेणे शक्य नाही

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सणासुदीला सुरुवात झाली आहे आणि त्यासोबतच ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या बंपर सेलही सुरू झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक ग्राहकांना स्वस्त आणि उत्तम वस्तू खरेदी करताना समस्यांना सामोरे जावे लागू शकते. असेच एक प्रकरण आयआयएम अहमदाबादच्या एका विद्यार्थ्यासोबत घडले आहे. त्याने फ्लिपकार्टवरून 50,000 रुपयांचा लॅपटॉप ऑर्डर केला होता. परंतु कंपनीने त्याला कपड्याचा साबण पाठवला.

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, यशस्वी शर्मा असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या बिग बिलियन डेज सेलमधून आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केला होता. पण फ्लिपकार्टने घड्याळाचा साबण पाठवला. मी कस्टमर केअरकडे तक्रार केली असता त्यांनी चूक मान्य करण्यास नकार दिला. एवढेच नाही तर सीसीटीव्हीचे पुरावे स्वीकारण्यासही कस्टमर केअरने नकार दिला. फ्लिपकार्टचे वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी अधिकारी यांनी यशस्वी शर्मा याला स्पष्ट सांगितले की, परत घेणे शक्य नाही. यशस्वीने आता फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनाही सोशल मीडियातून टॅग करून तक्रार नोदविली आहे.

यशस्वी शर्मा या विद्यार्थ्याने फ्लिपकार्टच्या या कृत्याची माहिती सोशल मीडियावर दिली.
यशस्वी शर्मा या विद्यार्थ्याने फ्लिपकार्टच्या या कृत्याची माहिती सोशल मीडियावर दिली.

वडिलांना माहित नव्हती ओपन बॉक्स संकल्पना
यशस्वी शर्मा याने त्यांच्या वडिलांची चूकही सोशल मीडियावर सांगितली. डिलिव्हरी बॉय जेव्हा सामानाची डिलिव्हरी करायला आला. तेव्हा त्याच्या वडिलांनी चूक केल्याचे त्याने लिहिले. त्याच्या वडिलांना 'ओपन-बॉक्स' डिलिव्हरीबद्दल माहिती नव्हती. असे यशस्वी आपल्या पोस्टमध्ये म्हणाला. डिलिव्हरी घेताना रिसीव्हरला डिलिव्हरी बॉयसमोर पॅकेट उघडावे लागते आणि वस्तू पाहिल्यानंतरच ओटीपी द्यावा लागतो. त्याच्या वडिलांना वाटले की, डिलिव्हरी घेताना OTP द्यावा लागतो. जे बहुतेक प्रीपेड डिलिव्हरींच्या बाबतीत असते. अनबॉक्सिंगचे सीसीटीव्ही फुटेज त्यांच्याकडे असल्याचे यशस्वी यांनी सांगितले. डिलिव्हरी बॉयने आपल्या ग्राहकाला ओपन बॉक्स संकल्पनेबद्दल का सांगितले नाही? नंतर अनबॉक्सिंग केल्यावर कळले की आत लॅपटॉप नाही तर साबण निघाला आहे.

3 वर्षांत ई-कॉमर्सविरोधातील तक्रारींत 6 पट वाढ

देशातील सर्वाधिक ग्राहकांच्या तक्रारी अ‌ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात करण्यात आल्या आहेत. या वर्षी आतापर्यंत ग्राहकांच्या जवळपास निम्म्या तक्रारी ऑनलाइन खरेदी सुविधा देणाऱ्या कंपन्यांविरुद्ध आहेत. विशेष म्हणजे ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्धच्या तक्रारींमध्ये वर्षानुवर्षे वाढ होत आहे.

या वर्षी 48% तक्रारी ई-कॉमर्स कंपन्यांशी संबंधित आहेत
यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) द्वारे केलेल्या तक्रारींपैकी 48% ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध होत्या. विशेष म्हणजे कोविडपूर्वी म्हणजे जानेवारी-ऑगस्ट 2019 मध्ये केवळ 8% तक्रारी ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध करण्यात आल्या होत्या. अवघ्या तीन वर्षांत या क्षेत्रातील कंपन्यांविरोधातील तक्रारी सहा पटीने वाढल्या. ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग म्हणाले, "ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांशी चांगली वागणूक देत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...