आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात सेल्स एक्झीक्युटिव्स म्हणून काम करणाऱ्या फक्त १९% महिला आहेत. एका अहवालानुसार, भारतात सेल्स लीडरशिपच्या भूमिकेतही महिलांचा भागीदारी फक्त १३% आहे. गुरुवारी आलेल्या एका अहवालानुसार, आयटी सेवेत आणि किरकोळ क्षेत्र महिलांना सर्वात जास्त संधी देतात. आयटी सेवेत २७% आणि किरकोळ क्षेत्रात २३% सेल्स एक्झिक्युटिव्ह महिला आहेत.
दुसरीकडे फार्मास्युटिकल (१०%), मॅन्युफॅक्चरिंग (१४%) आणि ऑटोमोटीव्ह इंडस्ट्रीज (१४%) या बाबतीत खूप मागे आहेत. ऑनलाइन प्रोफेशनल नेटवर्क लिंक्डइन इंडियाचे टॅलेंट अँड लर्निंग सॉल्युशन्सच्या संचालक, रुची आनंद सांगतात, “देशभरातील विक्री भूमिकांमध्ये स्त्री-पुरुष समानता दिसून येत नाही. परंतु या प्रकरणात आपण आशा करू शकतो. कारण नियोक्ते कौशल्यांचे मूल्यांकन केल्यानंतरच कामावर घेतात. असा दृष्टिकोण असला तर महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल.
लिंगभेद करण्यापेक्षा कौशल्याला प्राधान्य द्यावे कंपनी आणि संस्थांनी भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या कौशल्यांना प्रथम प्राधान्य द्यावे, असे या अहवालात सुचवण्यात आले. यामुळे सेल्स टीममध्ये महिलांचा सहभाग तर वाढेलच, शिवाय त्यांना करिअर घडवण्याच्या समान संधीही उपलब्ध होतील. याचा फायदा शेवटी कंपन्यांनाच होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.