आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीत १५० प्रभागांत मंगळवारी मतदान झाले. आकडेवारीनुसार संध्याकाळपर्यंत फक्त ३५.८०% मतदान झाले, ते अपेक्षेनुसार कमी आहे.
मतदान सकाळी ७ वाजता सुरू झाले, पण थंडीमुळे २ तासांपर्यंत बहुतांश केंद्रांकडे मतदार फिरकलेच नाहीत. सामान्यत: मनपासाठी ५०% च्या जवळपास मतदान होत आले आहे. भाजपने प्रथमच या निवडणुकीत सक्रिय होत जोरदार प्रचार केला. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, स्मृती इराणी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे प्रचार केल्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर इतर पक्षांनाही बराच जोर लावावा लागला. त्यामुळे मतदान वाढेल अशी अपेक्षा होती. पण अंतिम आकडेवारीपर्यंतही ही अपेक्षा पूर्ण झाल्याचे दिसत नाही. यंदा १,१२२ उमेदवार मैदानात आहेत.
माकपचे चिन्हच गायब, 69 केंद्रांवर मतदान रद्द
मलकापेटच्या ६९ मतदान केंद्रांवरील मतपत्रिकेवर माकपचे निवडणूक चिन्हच गायब होते. त्यामुळे तेथील मतदान रद्द करण्यात आले. ही प्रशासकीय बेपर्वाई असल्याचे सांगितले जात आहे. आता या जागांवर ३ डिसेंबरला मतदान होईल. निकाल ४ डिसेंबरला जाहीर होईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.