आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाेकसभा निवडणुकीला आणखी एक वर्षाहून जास्त कालावधी बाकी आहे. परंतु भाजपने मिशन-२०२४ साठी आतापासूनच ब्लूप्रिंट तयार केली आहे. मे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप विद्यमान २६ खासदारांपैकी केवळ चार खासदारांना पुन्हा उमेदवारी देणार आहे. उर्वरित २२ जागी पक्षाने प्रस्थापितांची तिकिटे कापण्याची तयारी केली आहे.
पुन्हा संधी मिळणाऱ्या चेहऱ्यांमध्ये अमित शहा (गांधीनगर), सी.आर. पाटील (नवसारी), विनाेद चावडा (कच्छ), भारतीबेन शियाल (भावनगर) यांचा समावेश आहे. गुजरातमध्ये लाेकसभेच्या २६ जागा आहेत. सर्व जागांवर भाजपचे खासदार आहेत. ८ जागांवर विद्यमान आमदारांना संधी दिली जाईल. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या काही जणांना देखील संधी मिळू शकते.
पंतप्रधान नरेंद्र माेदी गुरूवारी गुजरातेत हाेते. राजभवन येथे झालेल्या बैठकीत लाेकसभा निवडणुकीविषयीची ब्लूप्रिंट तयार करण्यात आली. भाजप विधानसभा निवडणुकीतील यशस्वी फाॅर्म्युला लाेकसभेतही वापरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.