आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारतात कोरोनामुळे होणारे मृत्यू बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आहेत. सध्या देशात कोरोनामुळे मृत्यूंचे प्रमाण १.४२ टक्के आहे. जगात मृत्यूंच्या बाबतीत भारत विसाव्या क्रमांकावर आहे. बुधवारी गेल्या २४ तासांत देशात १०४ मृत्यू झाले. समाधानाची बाब म्हणजे १९ राज्यांत गेल्या २४ तासांत एकही मृत्यू झाला नाही. भारतात होणारे ८१ टक्के नवे मृत्यू केवळ पाच राज्यांतच होत आहेत. १३ राज्यांमध्ये नवे मृत्यू ५पेक्षा कमी आहेत. सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. बुधवारी गेल्या २४ तासांत अर्धे म्हणजे ५१ मृत्यू येथे झाले. केरळ (१४) आणि पंजाबमध्ये (१०) मृत्यू १०पेक्षा जास्त आहेत. मात्र, देशात नवे रुग्ण आढळण्याचा वेग काही दिवसांपासून वाढला आहे. बुधवारी देशात १३७४२ नवे रुग्ण आढळले.
१९ राज्यांत एकही नवी मृत्यू नाही : १९ राज्ये, केंद्र शासित प्रदेशात बुधवारी गेल्या २४ तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. गुजरात, हरियाणा, राजस्थान, ओडिशा, झारखंड, चंडीगड, अासाम, लक्ष्यद्वीप, हिमाचल, लडाख, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय, अंदमार निकोबार, सिक्किम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, दादरा नगर हेवेली व दमन द्वीपमध्ये एकही मृत्यू झाला नाही.
दहा राज्यांत केंद्रातील तज्ज्ञांचे पथक चौकशीसाठी जाणार
भारतात कमीत कमी सात राज्यांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. तज्ज्ञांनुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, जम्मू- काश्मीरमध्ये रुग्ण वाढणे धोक्याचा इशारा आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत तज्ज्ञांचे पथक पाठवले जात आहे. हे पथक वाढीमागील कारण शोधून काढील.
सरकारचा क्वॉरंटाइन नियम अस्पष्ट : दिल्ली हायकोर्ट
दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, विदेशातून येणाऱ्या लोकांबाबत सरकारची क्वॉरंटाइन अधिसूचना स्पष्ट नाही. न्यायालयाने बुधवारी यूकेतून परतलेल्या एका कुटुंबाला होम क्वॉरंटाइनची परवानगी दिली. कुटुंबात दोन मुलांसह चार सदस्य आहेत. कोरोना अहवाल निगेटिव्ह येऊनही त्यांना विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये सात दिवसांसाठी क्वॉरंटाइन करण्यात आले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.