आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरण:लस घेण्यात खासदारांपेक्षा सर्वसामान्य वयोवृद्धच पुढे, 8 राज्यांतील 285 खासदारांपैकी फक्त 50 जणांचे लसीकरण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुरुवारी 16 जानेवारीनंतर देशात सर्वात जास्त 13.9 लाख डोस देण्यात आले

देशात ६० वर्षांवरील वयोवृद्धांना लस दिली जात आहे. ४ दिवसांत एकूण १६.१७ ज्येष्ठांनी पहिला डोस घेतला आहे. देशात गुरुवारी १६ जानेवारीनंतर सर्वाधिक १३.९ लाख डोस देण्यात आले. मात्र देशात साठीपार खासदारांत लसीबाबत उत्साह कमीच आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीबाबत विश्वास वाढवण्यासाठी पहिल्याच दिवशी स्वत:ही लस घेतली होती. देशात एकूण ७७७ खासदार आहेत. पैकी ३६६ जणांचे वय ६० च्या पुढे आहे. दैनिक भास्करने खासदारांच्या लसीकरणाची पडताळणी केली. ८ राज्यांत फक्त ५० खासदारांनीच लस घेतल्याचे त्यात समोर आले आहे.

आजार... डॉक्टर म्हणाले, १५ दिवसांनंतर लस घ्या
राजकाेटचे ६९ वर्षीय खासदार मोहन कुंदारिया म्हणाले की, मला अनेक आजार आहेत. माझ्या कुटुंबीयांनी लस घेतली आहे. डाॅक्टरांनी मला १५ दिवसांनंतर लस घेण्याचा सल्ला दिलेला आहे.

दिल्ली... ८ मार्चला संसद अधिवेशनाची प्रतीक्षा
खासदार राधामोहन सिंह, महाबली सिंह, छेदी पासवान, दिनेश चंद्र म्हणाले, सध्या आम्ही मतदारसंघात आहोत. संसद अधिवेशनासाठी दिल्लीत आल्यावर लस घेऊ. खा. रामविचार नेताम यांनीही संसदेत लस घेणार असल्याचे सांगितले.

तत्काळ... काही म्हणाले, १-२ दिवसांतच लस घेऊ
खा. मोहन मंडावी एक-दोन दिवसांत लस घेतील. लवकरच लस घेऊ असे काही खासदारांनी सांगितले. कोरबाच्या खासदार ज्योत्स्ना महंत यांनीही लस घेतली नाही. के.टी.एस. तुलसी यांनी लस घेतलेली आहे.

व्यग्र... आम्ही मतदारसंघात आहाेत म्हणून वेळच नाही
राजस्थानात राजेंद्र गहलोत हे लस घेणारे एकमेव खासदार आहेत. इतरांचे म्हणणे आहे की, आम्ही व्यग्र आहोत, वेळ मिळाल्यास पाहू. जदयू खासदार आर.पी. मंडल म्हणाले, ‘मी नुकताच कोरोनामुक्त झालोय, मला लस घ्यायची नाही.’

बातम्या आणखी आहेत...