आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार:राणांवरील राजद्रोहाचा गुन्हा अभ्यास करूनच; भोंग्यावर केंद्राने धोरण ठरवावे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राणांवरील राजद्रोहाचा निर्णय अभ्यास करूनच घेतला आहे. कोर्टाला निरीक्षण नोंदवण्याचा आधिकार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. भोंगा प्रकरणी केंद्र सरकारने एक धोरण ठरवायला हवे, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

कोर्टाला निरीक्षण नोंदवण्याचा अधिकार
गुन्हा दाखल करत असताना त्यांचा अभ्यास करून गुन्हा दाखल करण्यात येत असतो. राणा दाम्पत्याच्या बाबतीतही तसेच अभ्यास करून दाखल करण्यात आला आहे. कोर्टाला निरीक्षण नोंदवण्याचा आधिकार आहे, असेही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. न्यायालयाने काय टिप्णणी करावी हा त्यांचा निर्णय आहे असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

भोंग्या प्रकरणी केंद्राने धोरण शिकवावे

सर्व पक्षीय नेत्यांसोबत आम्ही या प्रकरणावर चर्चा केली आहे. मात्र राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर सर्वांनी सामस्याची भूमिका घेतली त्याबद्दल सर्वांचे अभार मानतो, असेही वळसे पाटील यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

बातम्या आणखी आहेत...