आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Only Neelam Sanjeev Reddy Has Been Elected Unopposed In The Presidential Election, Latest News And Update

राष्ट्रपती निवडणूक 2022:इतिहासात केवळ नीलम संजीव रेड्डींचीच झाली बिनविरोध निवड, आतापर्यंत 14 वेळा झाली निवडणूक

अनिरुद्ध शर्मा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक आयोगाने गुरुवारी देशाच्या 16 व्या राष्ट्रपतींच्या निवडीसाठी निवडणुकीची घोषणा केली. मागील 15 राष्ट्रपतींपैकी केवळ नीलम संजीव रेड्डी यांची राष्ट्रपतीपदी बिनविरोध निवड झाली. उर्वरित सर्वच 14 राष्ट्रपती निवडून आले. रेड्डींच्या निवडीवेळी एकूण 37 उमेदवार मैदानात होते. पण, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 21 जुलै रोजी तब्बल 36 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्याुमळे दुपारी 3 वा. नीलम संजीव रेड्डी यांच्या नावाची नवे राष्ट्रपती म्हणून घोषणा करण्यात आली.

नीलम रेड्डी यांनी पाचव्या राष्ट्रपती निवडणुकीतही सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना 3,13,548; तर व्ही. व्ही. गिरी यांना 4,01,515 मते मिळाली. गिरी राष्ट्रपती झाले. या निवडणुकीत उप राष्ट्रपती गिरी अपक्ष उमेदवार होते. तर रेड्डी काँग्रेसचे उमेदवार होते. पहिल्या व दुसऱ्या निवडणुकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली होती. या निवडणुकांत अनुक्रमे 5 व 3 उमेदवार मैदानात उतरले होते.

तिसऱ्या निवडणुकीत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापुढे 2 उमेदवार होते. 1967 मध्ये झालेल्या चौथ्या निवडणुकीत 17 उमेदवारांत मुकाबला झाला. राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवारांचा हा सर्वात मोठा आकडा होता. त्यातील 9 उमेदवारांना 0 मते पडली होती. तर डॉ. झाकीर हुसैन यांची राष्ट्रपतीपदी निवडणूक झाली होती. झाकीर हुसैन यांच्या आकस्मिक निधनामुळे 1969 साली राष्ट्रपतीपदाची पाचवी निवडणूक झाली होती.

या निवडणुकीतील 15 उमेदवारांपैकी व्ही. व्ही. गिरी राष्ट्रपती झाले. पहिल्या 5 राष्ट्रपती निवडणुकीत हरिराम चौधरी एक उमेदवार होते. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सर्वाधिक वेळा सहभाग घेतला होता. याशिवाय कृष्ण कुमार चॅटर्जी यांनीही तीनवेळा राष्ट्रपती निवडणुकीत सहभाग घेतला व निवडणूक लढली.

नीलम संजीव रेड्डी
नीलम संजीव रेड्डी

7 वेळा केवळ 2 उमेदवारांत मुकाबला

सहाव्या राष्ट्रपती निवडणुकीत त्रिदिव चौधरी यांचा पराभव करुन फखरुद्दीन अली अहमद देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाले. या निवडणुकीत प्रथमच दोन उमेदवार एकमेकांपुढे उभ टाकले होते. त्यानंतर 8 व्या व 11 ते 15 व्या निवडणुकीपर्यंत सलग 2 उमेदवारांत मुकाबला झाला.

11 व्या निवडणुकीत के. आर. नारायणन यांना मिळाली सर्वाधिक मते

11 व्या निवडणुकीत के. आर. नारायणन यांना सर्वाधिक 9, 56, 290 मते मिळाली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार टी. एन. शेषन यांना केवळ 50, 631 मते मिळाली. 12 व्या निवडणुकीत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना

11वें चुनाव में केआर नारायणन को 9,56,290 मत मिले, अब तक सर्वाधिक हैं। उनके मुकाबले टीएन शेषन को महज 50,631 मत मिले। 12वें चुनाव में डॉ. एपीजे अब्दुल कलाम को 9,22,884 मते मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...