आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:केवळ नीलम संजीव रेड्डीच बिनविरोध राष्ट्रपती, 14 वेळा निवडणुकीसाठी मतदान!

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेळाव्या राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या पंधरा निवडणुकांत १९७७ मध्ये झालेल्या सातव्या राष्ट्रपती निवडणुकीत नीलम संजीव रेड्डी अविरोध निवडून आले होते. बाकी सर्व १४ निवडणुकांत मतदान झाले. तेव्हा झालेल्या निवडणुकीत ३७ उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला होता. परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे २१ जुलै रोजी ३६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. दुपारी तीन वाजता रेड्डी यांना नूतन राष्ट्रपती म्हणून जाहीर करण्यात आले होते. रेड्डी यांनी पाचव्या निवडणुकीतही सहभाग घेतला होता. तेव्हा त्यांना ३,१३, ५४८ मते पडली. त्या निवडणुकीत व्ही.व्ही. गिरी ४,०१, ५१५ मते घेऊन आघाडीवर होेते. तेव्हा उपराष्ट्रपती गिरी अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते. रेड्डी काँग्रेसचे उमेदवार होते.

पहिल्या व दुसऱ्या निवडणुकीत डाॅ. राजेंद्र प्रसाद निवडून आले होते. या निवडणुकीत क्रमश: पाच व तीन उमेदवार रिंगणात होते. तिसऱ्या निवडणुकीत डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासमाेर आणखी दोन उमेदवार होते. १९६७ मधील चाैथ्या निवडणुकीत १७ उमेदवारांत सामना झाला होता.

राष्ट्रपती निवडणुकीतील उमेदवारांची ही सर्वाधिक संख्या होती. त्यापैकी नऊ उमेदवारांना शून्य मते पडली. डाॅ. झाकीर हुसेन निवडून आले होते. हुसेन यांच्या निधनामुळे १९६९ मध्ये पाचवी निवडणूक झाली. त्यात एकूण १५ उमेदवारांत व्ही.व्ही. गिरी यांची निवड झाली. पहिल्या पाच राष्ट्रपती निवडणुकांत हरिराम चाैधरी एक उमेदवार होते. राष्ट्रपती निवडणुकीत सर्वाधिक वेळा सहभाग घेणारे चाैधरी हे एकमेव उमेदवार होते. कृष्णकुमार चटर्जी यांनी तीन वेळा िनवडणूक लढवली होती.

सहाव्या राष्ट्रपती निवडणुकीत त्रिदिव चाैधरी यांचा पराभव करून फकरुद्दीन अली अहमद देशाच्या सर्वाेच्च पदावर आसनस्थ झाले. दोन उमेदवार आमनेसामने असल्याची ही पहिलीच निवडणूक होती. पुढे आठव्या आणि पंधराव्या निवडणुकीपर्यंत दोन उमेदवारांत लढत पाहायला मिळाली.

अकराव्या निवडणुकीत के.आर. नारायणन यांना सर्वाधिक मते
११ व्या राष्ट्रपती निवडणुकीत के.आर. नारायणन यांना ९,५६,२९० मते मिळाली. आजवर झालेल्या सर्व निवडणुकांत सर्वाधिक मते मानली जातात. टी.एन. शेषन यांना ५०,६३१ मते मिळाली होती. बाराव्या निवडणुकीत डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना ९,२२, ८८४ मते पडली. नारायणन व कलाम यांच्या व्यतिरिक्त अव्वल-५ मते मिळवणाऱ्यांमध्ये फकरुद्दीन अली अहमद, ग्यानीझेल सिंग व आर. व्यंकटरमन या नेत्यांचा समावेश राहिला आहे.

बातम्या आणखी आहेत...