आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशाचा आँखों देखा हाल:मथुरेत दोनच मंदिरे उघडली; लोक म्हणतात, कृष्ण द्वारकेला गेले तेव्हा येथे असा शुकशुकाट असेल...

मथुरा (धर्मेन्द्रसिंह भदौरिया)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देणग्या-नित्यपूजा बंद झाल्याने पुजारी अडचणीत, विदेशात ऑनलाइन कथा सांगणाऱ्या पुजाऱ्यांची अॅडव्हान्स बुकिंग झाली रद्द

वृंदावनच्या बिहारीपुरातील ४२ वर्षीय पंकज शर्मा रोज सकाळी स्नान करून घराबाहेर पडतात व बांकेबिहारी मंदिराच्या पायऱ्यांवर श्रद्धेने माथा टेकवतात. लॉकडाऊनमुळे मंदिर बंद असल्याने ते मूर्तीचे दर्शन न करता बाहेरून नमस्कार करतात. वृंदावनमध्ये मंदिराच्या पायऱ्यांना स्पर्श करून दिवसाची सुरुवात करणारे शेकडो भाविक आहेत.

देशभरात ८ जूनपासून मंदिरे उघडली, परंतु मथुरेत श्री कृष्ण जन्मभूमी मंदिर व द्वारकाधीश मंदिरच उघडले. ५ हजारांवर मंदिरे असलेले मथुरा, वृंदावन, गोकुळ, बरसाना आणि गोवर्धन येथील श्रीबंके बिहारी मंदिर, गोविंददेव मंदिर, कृष्णा-बलराम मंदिर (इस्कॉन मंदिर), पागलबाबा मंदिर, प्रेम मंदिर, निधीवन मंदिर, रामन रेती आश्रम-महावन, श्रीलाडली जी मंदिर, बलदेव मंदिर, मुकुट मुखारबिंदसह बृजची सर्व प्रमुख आणि छोटी मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत.

बृजी मुख्य यात्रा व यूपी सरकारचा राजकीय उत्सव असलेला मुडिया पुनो कोरोनामुळे रद्द करावा लागला. १ ते ५ जुलै दरम्यान होणाऱ्या यात्रेत एक कोटीहून अधिक भाविक येतात. धार्मिक पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. हॉटेल रिकामी आहेत. कपडे, प्रसाद व मिठाईची दुकाने, टॅक्सी-ट्रॅव्हल्सचा व्यवसाय ठप्प आहे. ४ हजार पुरोहित घरीच आहेत. बृज तीर्थ विकास परिषदेचे उपाध्यक्ष शैलजा कांत मिश्रा म्हणाले, बृज प्रदेशात वर्षाकाठी अडीच ते तीन कोटी लोक येतात. ५ हजारांहून अधिक मंदिरांना भेट देतात. रोज १५ हजार वाहने येतात. दानघाटीचे मुख्य सेवेकरी पवन कौशिक म्हणाले, एकादशी ते पौर्णिमेदरम्यान आठ ते १० लाख लोक येतात, तर दरमहा १५ लाख लोक गोवर्धन परिक्रमेला भेट देतात. पण सध्या महिन्याला येणारे ६० ते ८० लाख रुपयांचे दानही बंद आहे. मथुरेतील लोक म्हणतात, श्रीकृष्ण द्वारकेला गेले तेव्हाच येथे असा शुकशुकाट झाला असेल.

अवघ्या १० मिनिटांत संपते भाविकांची रांग

मथुरेतील दोन्ही मंदिरांत येणाऱ्या भाविकांची संख्या मोजकीच आहे. २० जून रोजी भास्कर टीम येथे उपस्थित होती. तेव्हा हॉलमध्ये मंदिर व्यवस्थापन व सुरक्षा रक्षक वगळता फक्त ६ जण होते. सकाळी १० वाजता उघडणाऱ्या द्वारकाधीश मंदिरात १० मिनिटांत भाविकांची रांग संपते. श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थानचे व्यवस्थापकीय समितीचे सदस्य गोपेश्वरनाथ चतुर्वेदी म्हणाले, बृज मंडळाची अर्थव्यवस्था यात्रेकरूंवर अवलंबून आहे. पूर्वी दररोज १५-२० हजार भाविक येत असत. आता एक हजारसुद्धा येत नाहीत. सेवा संस्थानच्या ४४ खोल्यांपैकी एकही बुक झालेली नाही. श्री द्वारकाधीश मंदिरातही अशीच परिस्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...