आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Onset Of Monsoon Over Kerala Likely To Be Delayed By Four Days Says IMD, Monsoon Latest News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामान विभाग:मान्सूनला केरळमध्ये दाखल होण्यास होऊ शकतो 4 दिवस उशीर, आता 5 जून रोजी आगमन अपेक्षित

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • गेल्या 15 वर्षात हवामान खात्याचा अंदाज जवळपास योग्य ठरला

मान्सून केरळात दाखल होण्यासाठी आणखी चार दिवस उशीर होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तो 5 जूनपर्यंत किंवा चार-पाच दिवस मागेपुढे केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. याआधी मान्सून 1 जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. केरळमध्ये मान्सूनचे आगमन होताच देशात चार महिन्यांच्या पावसाळाल्या सुरुवात होते. 

गेल्या 15 वर्षात हवामान खात्याचा अंदाज जवळपास योग्य ठरला

हवामान विभागानुसार मागील 15 वर्षांत 2015 वगळता त्यांचा अंदाज खरा ठरला आहे. गेल्या वर्षी 8 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. हवामान विभागाने 6 जूनचा शक्यता वर्तवली होती. 2015 मध्ये हवामान खात्याने 30 मे रोजी अंदाज वर्तविला होता, परंतु मान्सून 5 जूनला केरळमध्ये पोहोचला होता.

यावर्षी मान्सून सामान्य राहील, 100% पाऊस पडेल

हवामान खात्याने एप्रिलमध्ये पावसाचा पहिला अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार यावर्षी पाऊस सामान्य राहणार आहे. पावसाची दीर्घ मुदतीची सरासरी 100% असेल. 96 ते 100% पाऊस हा सामान्य मान्सून मानला जातो.

दोन टप्प्यांत जारी होतो अंदाज 

दरवर्षी हवामान विभाग दोन टप्प्यात दीर्घकालीन अंदाज जारी करते. पहिला अंदाज एप्रिलमध्ये तर दुसरा अंदाज मे-जूनमध्ये जारी केला जातो. यासाठी सांख्यिकीय एकत्रित पूर्वानुमान प्रणाली आणि महासागर वातावरणीय मॉडेल्सची मदत घेतली जाते. 1961 ते 2010 दरम्यान भारतात दरवर्षी सरासरी 88 सेमी पावसाची नोंद करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...