आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Operation Lotus Vs Delhi AAP Government । Arvind Kejriwal MLA Meeting Updates । Press Conference In Delhi Today | Delhi News

केजरीवालांच्या बैठकीला 9 आमदार गैरहजर:दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले- सरकार पाडण्यासाठी भाजप 800 कोटी खर्च करण्याच्या तयारीत

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया एका निवडणूक प्रचार कार्यक्रमात एकत्र उपस्थित असताना. हा फोटो 22 ऑगस्टचा आहे.

'ऑपरेशन लोटस'च्या मुद्द्यावरून गुरुवारी दिल्लीत राजकीय गदारोळ सुरूच आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 9 आमदार पोहोचले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षश्रेष्ठींचा काही आमदारांशी संपर्कही होऊ शकला नाही.

बैठकीनंतर केजरीवाल राजघाटावर पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले- भाजप आमच्या 40 आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे. सर्व आमदारांना 20-20 कोटींची ऑफर दिली जात आहे. भाजप नेत्यांना 800 कोटी खर्च करून दिल्ली सरकार पाडायचे आहे. 70 जागांच्या दिल्ली विधानसभेत 'आप'ला 62 आणि भाजपला 8 जागा आहेत.

बैठकीनंतर आपचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, दिल्ली सरकारला कोणताही धोका नाही. सरकार स्थिर असून न आलेले आमदार कामासाठी गेले आहेत. भाजपने आमच्या 12 आमदारांना पक्ष सोडण्याची ऑफर दिली आहे.

सिसोदिया आणि अध्यक्षही पोहोचले नाहीत, केजरीवाल राजघाटावर जाणार

सौरभ म्हणाले की, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयलदेखील बैठकीला पोहोचले नाहीत. सिसोदिया हिमाचल प्रदेशात गेले आहेत. दुसरीकडे, ऑपरेशन लोटसच्या अपयशानंतर अरविंद केजरीवाल राजघाटावर जाऊन तेथे मूक उपोषण करणार आहेत.

40 आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू- दिलीप पांडे

आपचे आमदार दिलीप पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, काल संध्याकाळपासून काही आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही. आम्ही सतत बोलण्याचा प्रयत्न करत असतो. लवकरच सर्व आमदार बैठकीला पोहोचतील. आमचे 40 आमदार फोडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

'आप'ने 4 आमदारांसह केला खुलासा

आम आदमी पक्षाने (आप) बुधवारी पत्रकार परिषद घेतली. आपचे नेते संजय सिंह म्हणाले की, आम्ही ऑपरेशन लोटसबाबत खुलासा केला. ते म्हणाले की, भाजपने आमच्या आमदारांना ऑफर दिली. 'आप' सोडल्यास 20 कोटी आणि इतरांना सोबत आणले तर 25 कोटी देऊ, अशी ऑफर होती.

संजय सिंह म्हणाले- आमचे आमदार संजीव झा, सोमनाथ भारती, कुलदीप कुमार आणि आणखी एका आमदाराला भाजपने पक्ष सोडण्याच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. संजय सिंह यांच्यासोबत सोमनाथ भारतीही पत्रकार परिषदेत होते. ते म्हणाले की, भाजपच्या लोकांनी मला सांगितले की 'आप'चे आणखी 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत.

दिल्लीत आप आणि भाजपमध्ये 19 ऑगस्टपासून तणाव

CBIने उत्पादन शुल्क धोरणाबाबत दिल्लीत पहिल्यांदाच 19 ऑगस्ट रोजी मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकला. हा छापा सुमारे 14 तास चालला, त्यानंतर सीबीआयने याप्रकरणी पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून आप केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपच्या विरोधात आवाज उठवत आहे. छापेमारीनंतर सिसोदिया म्हणाले होते की, भाजपने त्यांना 'आप' सोडण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती.

दुसरीकडे भाजपने प्रत्युत्तरात म्हटले- भ्रष्टाचाराचे आरोप टाळण्यासाठी आम आदमी पार्टी खोटेपणाचे वातावरण तयार करत आहे. मनीष सिसोदिया यांना उत्तर द्यावे लागेल, असे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी बुधवारी सांगितले होते.

दिल्लीत एकूण 70 जागा, 'आप'कडे 62

70 जागांच्या दिल्ली विधानसभेत 'आप'ला 62 आणि भाजपला 8 जागा आहेत. सरकार स्थापनेसाठी 36 आमदारांची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...