आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Operation Under The Supervision Of NSA Doval: Myanmar Will Hand Over 22 Infiltrators Operating In The Northeast To India Today, With Ties To 6 Groups; Special Aircraft Will Reach Guwahati

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिशन फत्ते:एनएसए अजित डोभाल यांच्या निरीक्षणाखाली 22 घुसखोर भारताला सुपूर्द करत आहे म्यानमार; 6 प्रतिबंधित गटांशी होते संबंध

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्यानमारकडून घुसखोरांना भारताकडे सुपूर्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे

म्यानमारने आपल्या देशातील 22 घुसखोर भारताला सुपूर्द केले आहेत. हे सर्वच घुसखोर ईशान्य भारतातील सीमावर्ती भागांमध्ये सक्रीय होते. ही संपूर्ण मोहिम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या निरीक्षणाखाली पार पडली. याला भारताचे मोठे मुत्सद्दी यश मानले जात आहे. घुसखोरांना घेऊन येणारे विमान इंफाळला थांबणार त्यानंतर गुवाहाटीला जाणार आहे. म्यानमारकडून घुसखोर भारताच्या हवाली करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घुसखोरांना मणीपूर आणि आसामच पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे. हे सगळेच एनडीएफबी (एस), एनएनएलएफ, पीआरईपीएके (प्रो), केवायकेएल, पीएलए आणि केएलओ या प्रतिबंधित गटांचे सदस्य आहेत.

म्यानमार आर्मीने राबविली होती मोहिम

गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात म्यानमारच्या लष्कराने भारतीय घुसखोरांच्या विरोधात एक मोहिम चालवली होती. हे सर्वच घुसखोर म्यानमारमध्ये लपले होते. या मोहिमेला मदत करण्यासाठी भारतीय लष्कराचे जवान सुद्धा म्यानमारच्या सीमेलगत गेले होते. गेल्या वर्षी जूनमध्ये ईस्टर्न आर्मी कमांड राहिलेले लेफ्टनंट जनरल एमएम नरवणे (सध्याचे लष्करप्रमुख) म्हणाले होते, की म्यानमार लष्कराने वेळोवेळी ईशान्य भारतात सक्रीय असलेल्या टोळ्यांवर कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...