आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Opinions In The Minds Of All Political Parties; Inflation In The Minds Of The People

गुजरात निवडणूक 2022:सर्व राजकीय पक्षांच्या मनात मते; जनतेच्या मनात माेरबी-महागाई

अर्जुन डांगर । साैराष्ट्राहून10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या सौराष्ट्रात उमेदवार घरोघर भेटी देत आहेत. काही ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद मिळतोय, काही टाळू लागलेत तर काही मतदार नवा मुद्दा मांडत आहेत. राजकीय पक्ष मोरबी दुर्घटनेतील १३५ जणांच्या मृत्यूवर मूग गिळून आहेत. कारण कुणालाही मते गमवायची नाहीत. ५४ पैकी १६ जागांवर भाजप, काँग्रेस, आपने पाटीदार उमेदवार दिले आहेत. येथे समोरासमोर टक्कर होणार आहे. काही ठिकाणी धर्म तर काही ठिकाणी जातीचा आधार घेतला जात आहे. गेल्या वेळी पाटीदार मुद्दा काँग्रेसच्या बाजूने होता. या वेळी काँग्रेसऐवजी लोक उमेदवाराकडे पाहून मतदान करू शकतात. काँग्रेससाठी अंतर्गत वाद हेच मोठे आव्हान आहे.

पाटीदारांचा पाठिंबा कुणाला ? - पाटीदार उमेदवार उतरवण्यात आलेल्या जागांवर तिन्ही पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागात पाटीदारांचा पाठिंबा मिळणाऱ्या पक्षालाच मोठा फायदा होईल, असे संकेत मिळतात. आेबीसी किंवा इतर वर्गातील उमेदवार काही ठिकाणी गणित बदलून टाकू शकतात. कच्छमध्ये आप जास्त परिश्रम घेत आहे. कच्छमध्ये भाजप व काँग्रेसला एक फायदा दिसून येतो. या भागात अपक्षांची संख्या कमी आहे. त्यातही सौराष्ट्रातील जुनागड, अमरेली, गीर सोमनाथ जिल्ह्यांतील काही जागांवर आप आणि अपक्ष उमेदवार भाजप व काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकतात. तूर्त तरी भाजप शहरी भागात आपला रोखण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे.

भाजपचा १९ जागांवर भर - भाजपला जुनागड, अमरेली, राजकोट (पूर्व) यासह ९ जागांची चिंता लागली आहे. शहरी भागात काँग्रेसला कोणाचीही मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. आपसाठी कच्छ चिंतेचा विषय ठरतो. १९ मतदारसंघांत भाजप रणनीतीसह वाटचाल करू लागला आहे. येथे अंतर्गत नाराजी, जातीय समीकरणही आहे.

मेधा पाटकरांमुळे नर्मदा २० वर्षे विलंबाने सौराष्ट्रात : शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी द्वारकेच्या खंबालियासह इतर ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. यादरम्यान त्यांनी काँग्रेस व आपवर टीका केली. ते म्हणाले, आपने मेधा पाटकर यांना गुजरातमधून लोकसभेची निवडणूक लढवायला लावली होती. पाटकरांनी नर्मदेच्या पाण्याला कच्छ व सौराष्ट्रात येण्यापासून रोखण्याचे पाप केले होते. त्यांनी गुजरातच्या जीवनरेखा नर्मदा प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. त्यामुळे नर्मदा कच्छ-सौराष्ट्रात पोहोचण्यासाठी २० वर्षे लागली, असे शहा यांनी सांगितले.

समुदायाच्या अस्तित्वाबाबत काँग्रेस अनभिज्ञ काँग्रेसचे नेते भारतातील आदिवासी समुदायाच्या अस्तित्वाबद्दल दीर्घकाळ अनभिज्ञ राहिले. ते भारतात भगवान राम, श्रीकृष्णाच्या कालखंडापासून सोबत राहिलेले नाहीत का? ते १८५७ च्या बंडात नव्हते का? - नरेंद्र माेदी आदिवासीबहुल भरुचमध्ये

भाजपसाठी तुम्ही वनवासी, आमच्यासाठी आदिवासी आजीने (इंदिरा गांधी) देशाचे पहिले मालक आदिवासी आहेत, असे शिकवले. आदिवासींची प्रगती होऊ नये, असे भाजपला वाटते. ते तुमची आेळख पुसू इच्छितात. पण आम्हाला हा इतिहास, जीवनपद्धती सुरक्षित राहावी वाटते. -राहुल गांधी, सुरतमध्ये

बातम्या आणखी आहेत...